Esha Deol And Bharat Takhtani Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Esha Deol Video: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मीडिया समोर आली ईशा देओल, म्हणाली - 'मी ठिक आहे'

Priya More

Esha Deol And Bharat Takhtani Divorce:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ईशा देओलने तिचा पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला. ईशा देओलच्या घटस्फोटामुळे (esha deol and bharat takhtani divorce) सर्वांना मोठा धक्का बसला. दोघांनी २०१२ मध्ये कुटुंबीयांच्या संमतीने लग्न केले.

पण फेब्रुवारी २०२४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. १२ वर्षांचा त्यांचा सुखी संसार तुटला. घटस्फोटानंतर ईशा देओल सध्या आपल्या आई हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या घरी राहते. घटस्फोटाच्या बातम्यांनंतर ईशा देओल मीडियापासून दूर होती. पण आज ती पहिल्यांदाच मीडिया समोर आली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ईशा देओल आज मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. पापाराझींनी ईशाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. ईशा देओल आपल्या कारमधून उतरून मुंबई एअरपोर्टच्या दिशने जात होती. पापाराझींनी ईशाला तिच्या तब्ब्येतीबद्दल विचारले. तर ईशाने त्यांना मी ठिक आहे. असे उत्तर दिले. यावेळी ईशाच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्टपणे दिसत होते. ईशाने घटस्फोट घेतल्यानंतर तिची आई हेमा मालिनीने तिला साथ दिली. ईशा देओलसोबतच तिच्या दोन्ही मुली राहतात. ईशा आणि भरत यांनी लग्नाआधी बरीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते.

ईशाच्या आजच्या एअरपोर्ट लूकबद्दल सांगायचे झाले तर, यावेळी तिने डेनिमसह पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची टोपी घातली होती. ईशा देओलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'पप्पाचे पैसे मिळाले आहेत, मला बरे वाटत आहे, त्यामुळेच मी घटस्फोट घेतला आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'लवकरच दुसरे लग्न होणार आहे.' तिसऱ्याने युजरने लिहिले की, 'तारुण्यातील हेमा मालिनी'. यावेळी ईशा देओल एकटीच एअरपोर्टवर दिसली. तिच्यासोबत मुली नव्हत्या.

दरम्यान, ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांचा घटस्फोट झाल्यामुळे ईशा देओलची आई हेमा मालिनी आणि वडील धर्मेंद्र हे खूपच दु:खी झाले आहेत. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांना दोन मुली आहेत. सध्या दोन्ही मुली ईशासोबतच राहतात. रिपोर्ट्सनुसार, घटस्फोट घेताना दोघांनीही सांगितले होते की ते आपल्या मुलींना एकत्र वाढवतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT