Anushka Sharma and Virat Kohli  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma And Virat Kohli: अनुष्का आणि विराटच्या घरी लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन, खरंच दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे का अभिनेत्री?

Anushka Sharma Pregnant Second Time: अभिनेत्रीच्या प्रग्नेंसीची चर्चा यासाठी होत आहे कारण काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट मुंबईतील एका मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाले होते.

Priya More

Anushka Sharma Pregnant Again:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-वडील होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. अनुष्का शर्मा प्रग्नेंट असून ती लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्रीच्या प्रग्नेंसीची चर्चा यासाठी होत आहे कारण काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट मुंबईतील एका मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाले होते.

अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळत आहे. ती ना विराट कोहलीसोबत प्रवास करत आहे आणि ना ती कोणत्याही क्रिकेटच्या सामन्यात दिसत आहे. अशामध्ये अनुष्का आणि विराट मॅटर्निटी क्लीनिकच्या बाहेर दिल्यामुळे अभिनेत्रीच्या प्रग्नेंट असल्याच्या बातम्यांना वेग आला आहे. पण अद्याप या कपलने अधिकृतपणे घोषणा केली नाही.

हिंदुस्तान टाईम्समध्ये दिलेल्या बातमीनुसार, 'अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतेच मुंबईतील एका हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाले होते. जिथे दोघांनी पापाराझींना त्यांचे फोटो शेअर करू नका अशी विनंती केली होती. हे दोघेही लवकरच याची अधिकृत घोषणा करतील, असे आश्वासनही देण्यात आले. या जोडप्याने त्यांच्या घरी गणपतीची स्थापनाही केली होती. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले होते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बी-टाऊनचे प्रसिद्ध कपल आहे. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये या जोडप्याने मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या चार वर्षांनंतर या कपल आई-बाबा झाले. त्यांनी चिमुकल्या वामिकाचे स्वागत केले. विराट-अनुष्का त्यांच्या पहिल्या मुलीच्या गोपनीयतेबाबत खूप जागरूक आहेत. त्यांनी पहिल्या प्रग्नेंसीबाबत खूपच गोपनियता ठेवली होती. अजूनही ते आपल्या मुलीचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deool Band 2 Collection : 'देऊळ बंद २' ची गगन भरारी! प्रवीण तरडेंच्या चित्रपटाने २० दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

Mumbai Monsoon : मुंबईत मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी

संभाजीनगर जिल्ह्यात ७४ हजार महिलांचा लाभ बंद, इतक्या लाडक्या बहिणी ठरल्या पात्र, पाहा आकडेवारी

जिमला जाण्याऐवजी 'या' 5 चटणी खा, वजन झटक्यात होईल कमी

SCROLL FOR NEXT