Alia Bhatt Buys Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Buys Car: आलिया भटने स्वत:ला गिफ्ट केली आलिशान कार, किंमत ऐकून बसेल धक्का; कार कलेक्शनची लिस्ट पाहाच..

National Film Award: आलियाने नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आलिशान कार खरेदी (Alia Bhatt Buys Car) केली आहे. ही कार खरेदी करत आलियाने स्वत:लाच गिफ्ट केली आहे.

Priya More

Bollywood Actress Alia Bhatt:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या चांगलीच चर्चेत आहे. आलिया भटला नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' (gangubai kathiawadi) या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने (National Film Award) सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आलियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

तर दुसरीकडे आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे आलियाने नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आलिशान कार खरेदी (Alia Bhatt Buys Car) केली आहे. ही कार खरेदी करत आलियाने स्वत:लाच गिफ्ट केली आहे. तिच्या या लक्झरी कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. आलियाच्या या कारची किंमत ऐकून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

आलिया भटच्या आलिशान कार कलेक्शनमध्ये आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे. आलियाकडे आधीच अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. पापाराझीने आलिया भटच्या नवीन कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आलियाची नवीन कार दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, आलियाने रेंज रोव्हरची ऑटोबायोग्राफी लॉन्ग व्हील बेस ही कार खरेदी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आलिया भट्टच्या नवीन कारची किंमत किती ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. रेंज रोव्हरच्या या नवीन मॉडेलची किंमत 3.81 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की अभिनेत्री आलिया भटने आपल्या नव्याकोऱ्या काळ्या रंगाच्या कारची पूजा देखील केली आहे. तिच्या कारला हार घातल्याचे दिसत आहे.

आलिया भटला तिच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावेळी आलियाने संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले ज्यांनी तिला 'गंगूबाई काठियावाडी'साठी कास्ट केले आणि तिच्यात इतकी सुधारणा केली की आज ती राष्ट्रीय पुरस्कार जिंकू शकली. आलियासोबतच अभिनेत्री क्रिती सेनॉनला देखील तिच्या मिमी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आलिया भटचे कार कलेक्शन -

- लँड रोवर - Range Rover Vogue

- ऑडी A6

- BMW 7-Series

- Audi Q5

- Audi Q7

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT