Vicky Kaushal Injured Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal Injured: विकी कौशलच्या हाताला काय झालं? व्हिडीओ पाहून चाहते आले चिंतेत

Vicky Kaushal Spotted With Injured Hand: विकी कौशलचा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे. विकी कौशलला बुधवारी संध्याकाळी त्याच्या घराबाहेर पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले.

Priya More

Vicky Kaushal Video:

'साम बहादूर' चित्रपटाच्या यशामुळे बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) चांगलाच चर्चेत आला आहे. 'साम बहादूर'च्या यशानंतर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा बिग बजेट चित्रपट विकी कौशलच्या हाती लागला आहे. संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटामध्ये तो रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात विक्कीला पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटामुळे विकी कौशल चांगलाच चर्चेत आहे. अशामध्ये आता विकी कौशलचा एक व्हिडीओ (Vicky Kaushal Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत.

विकी कौशलचा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे. विकी कौशलला बुधवारी संध्याकाळी त्याच्या घराबाहेर पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विकीच्या हाताला फॅक्चर झाले अशून त्याने आपल्या हाताला प्लास्टर स्लिंग लावले आहे. विकीसोबत नेमकं काय घडलं?, त्याचा हात फॅक्चर कसा झाला असा प्रश्च सर्वांना पडला आहे.

विकी कौशलचा हा व्हिडिओ व्हायरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. याव्हिडिओमध्ये दिसत आहे की, विकी कौशल ग्रे कलरचा टी-शर्ट आणि ग्रे कलरच्या शॉर्ट्स घालून कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्याच्या डाव्या हाताला प्लास्टर केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये विकी कौशलही पापाराझींकडे पाहून हसताना दिसत आहे. मात्र अभिनेत्याता हात फॅक्चर झाल्या पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. विकी कौशल लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

अलीकडेच संजय लीला भन्साळी यांनी विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाची घोषणा केली आहे. 'लव्ह अँड वॉर' व्यतिरिक्त विक्की कौशलने नुकतेच 'छावा' या पीरियड ड्रामाचे शूटिंग पूर्ण केले आहे. छावामध्ये रश्मिका मंदान्ना विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विकी कौशल शेवटचा मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' या चित्रपटात दिसला होता. सॅम बहादूरसाठी विकीला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

SCROLL FOR NEXT