Yodha Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yodha Movie Review: सिद्धार्थ मल्होत्राने 'योद्धा' बनून प्रेक्षकांना केलं इम्प्रेस, नेटकऱ्यांना कसा वाटला चित्रपट?

Sidharth Malhotra- Raashii Khanna And Disha Patani: करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या ॲक्शन चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​देशाच्या रक्षणासाठी कमांडोची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा ॲक्शन लूक खूपच प्रभावी आहे.

Priya More

Yodha Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) ॲक्शनपॅक्ड चित्रपट 'योद्धा' (Yodha Movie) अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या ॲक्शन चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​देशाच्या रक्षणासाठी कमांडोची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा ॲक्शन लूक खूपच प्रभावी आहे.

या चित्रपटामध्ये सिद्धार्थसोबत राशि खन्ना आणि दिशा पटानीही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंमधून चांगली कमाई केली. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक आणि सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. 'योद्धा'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या प्रेक्षकांचे या चित्रपटाबाबत नेमकं काय म्हणणे आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' या ॲक्शन ड्रामा चित्रपटाला शोच्या पहिल्याच दिवशी खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'योद्धा' चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जाऊन त्यांना चित्रपट नेमका कसा वाटला, चित्रपटामधील कोणती गोष्ट आवडली हे सांगितले आहे. एका युजरने चित्रपटाबद्दल लिहिले की - 'इंटरव्हल ब्लॉक, क्लायमॅक्स आणि ट्विस्ट-टर्न तुमचे मन मोकळे करेल. सिद्धार्थ मल्होत्राचा अभिनय अप्रतिम आहे. कथानक अपेक्षेइतके चांगले नाही. दिग्दर्शन चांगले आहे. दिशा आणि राशीचा अभिनय सुरेख आहे. एकंदरीत योद्धा चांगला चित्रपट आहे.'

'योद्धा' चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राची डॅशिंग ॲक्शन चित्रपट रसिकांना आकर्षित करत आहे. 'योद्धा' चित्रपट पाहिल्यानंतर आणखी एका युजरने लिहिले की, 'योद्धामध्ये सिद्धार्थ मल्होत्राची फादर लेव्हल एंट्री, त्याचा स्वॅग, त्याची चालण्याची स्टाइल आणि ॲक्शन सीन्स मन मोकळे करणारे आहेत.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'एक नंबर अॅक्शन पैसा वसूल... सरप्राइज क्लाइमॅक्स... योद्धा अप्रतिम.' तर काही युजर्स या चित्रपटाला सर्वोत्तम हायजॅकवर आधारित चित्रपट म्हणत आहेत. तर काही युजर्सनी सिद्धार्थ मल्होत्राची तुलना 'शेरशाह'शी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT