Shah Rukh Khan And Ed Sheeran Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan ने हॉलिवूड सिंगर Ed Sheeran ला शिकवली आयकॉनिक रोमँटिक पोज, VIDEO होतोय व्हायरल

Shah Rukh Khan And Ed Sheeran: हॉलिवूडचा सिंगर एड शीरन (Hollywood Singer Ed Sheeran ) भारतामध्ये आला आहे. नुकताच त्याने शाळकरी मुलांची भेट घेतली. त्यानंतर तो बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना देखील भेटत आहे.

Priya More

Shah Rukh Khan And Ed Sheeran Video:

बॉलिवूडचा (Bollywood) 'बादशाह' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुखच्या चाहतावर्गामध्ये हॉलिवूडमधील (Hollywood) काही सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. अशामध्ये भारतामध्ये आलेल्या हॉलिवूडचा सिंगर एड शीरनने (Ed Sheeran) नुकताच शाहरुख खानची भेट घेतली. एड शीरन हा देखील शाहरुखचा मोठा फॅन आहे. एड शीरनचे कॉन्सर्ट आहे त्यासाठी तो भारतामध्ये आला आहे. अशामध्ये शाहरुख खानने एड शीरनला आयकॉनिक रोमँटिक पोज शिकवली. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हॉलिवूडचा सिंगर एड शीरन (Hollywood Singer Ed Sheeran ) भारतामध्ये आला आहे. नुकताच त्याने शाळकरी मुलांची भेट घेतली. त्यानंतर तो बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना देखील भेटत आहे. त्याने आतापर्यंत आयुष्मान खुराना आणि अरमान मलिक यांची भेट घेतली. बुधवारी रात्री त्याने बॉलिवूडचा किंग खान आणि रोमान्स किंग शाहरुख खानची भेट घेतली. यावेळी फराह खान देखील त्यांच्यासोबत होती. शाहरुख आणि एड शीरन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख शीरनला त्याची आयकॉनिक पोज शिकवत आहे. शीरन देखील त्याच्या पोजची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओच्या शेवटी शाहरुखने एड शीरनला मिठी मारली

विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. शाहरुख आणि शीरन दोघांच्याही चाहत्यांना हा व्हिडीओ आवडत आहे. अनेकांनी शाहरुखला बेस्ट म्हटले आहे. तर काहींनी 'आग लावून टाकली' अशा देखील कमेंट्स केल्या आहेत. सध्या या व्हिडीओवर केमेंट्सचा पाऊस पडत आहे.

शाहरुख खानने 2023 या वर्षामध्ये बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. शाहरुखचे एकापाठोपाठ ३ चित्रपट रिलीज झाले. 'जवान', 'पठान' आणि 'डंकी' हे तीन चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. त्याच्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले असून त्यांनी बक्कळ कमाई केली. आता शाहरुख खान यावर्षी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टायगर ३'मध्ये शाहरुख सलमान खानसोबत कॅमिओ करणार आहे. 'टायगर व्हर्सेस पठान'वरही काम सुरू असल्याचा दावा केला जात आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत सलमान देखील दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Elections 2026 voting Live update : आमदार रोहित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

CNG-PNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला फटका! CNG-PNG गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा आजचे दर

Maharashtra Live News Update: - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी

Guava Leaves For Long Hair Growth: केसांसाठी पेरूच्या पानांचा करा वापर, १५ दिवसात केस होतील लांब आणि दाट

कबुतराचा दुकानात ज्वेलर्सवर डल्ला, सोन्याची साखळी घेऊन उडालं|VIDEO

SCROLL FOR NEXT