Saif Ali Khan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Video: जेहचा फोटो काढणाऱ्या पापाराझींवर संतापला सैफ अली खान, VIDEO होतोय व्हायरल

Saif Ali Khan Angery On Paparazzi: सैफचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैफचा मुलगा जेहचे फोटो काढणाऱ्या पापाराझींची सैफ अली खानने चांगलीच शाळा घेतली आहे.

Priya More

Actor Saif Ali Khan:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सैफ अली खान मीडियाच्या समोर नेहमी खूप चांगला वागतो. तो मीडियाचा खूप आदर देखील करतो. पण आता असं काही घडलं आहे ज्यामुळे सैफ अली खान पापाराझींवर संतप्त (saif ali khan angery on paparazzi) झाला आहे. सैफचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैफचा मुलगा जेहचे फोटो काढणाऱ्या पापाराझींची सैफ अली खानने चांगलीच शाळा घेतली आहे.

सैफ अली खान चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे तो पापाराझींवर संतापला. नुकताच करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सैफ अली खान कुल लूकमध्ये दिसत आहे. करीना कपूर देखील विंटर लूकमध्ये खूपच छान दिसत आहे. पण हा व्हिडिओ करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लूकमुळे चर्चेत आला नाही तर अन्य काही कारणांमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये सैफ अली खान पॅप्सवर म्हणजेच पापाराझींवर चिडताना दिसत आहे.

सैफ अली खान आपला मुलगा जेहला फुटबॉल खेळून झाल्यानंतर घरी जाण्यासाठी कारच्या दिशेने घेऊन येत असतो. तेव्हा पापाराझी सतत जेहचे फोटो क्लिक करत होते. हे पाहून सैफ अली खान संतापला आणि म्हणाला, 'मुलं फुटबॉल खेळत आहेत, तुम्ही लोक याला फिल्मी इव्हेंट बनवू नका.' सैफ अली खानचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सैफ अली खान चांगलाच चर्चेत आला आहे.

सैफ अली खानच्या या व्हायरल व्हिडिओवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. बहुतेक नेटिझन्स सैफ अली खानशी या मुद्द्यावर सहमत असल्याचे दिसून येत आले. सैफ अली खान जे काही बोलले ते अगदी बरोबर असल्याचे मत काही नेटिझन्सनी व्यक्त केले आहे. दरम्यान, करीना कपूर आणि सैफ अली खान सध्या आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देत आहे. नुकतेच करीना आणि सैफ कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेले होते. नववर्ष सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो करीनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. हे कपल आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ देताना नेहमी दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

SCROLL FOR NEXT