Ranbir Kapoor And Arijit Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

कॉन्सर्ट सुरू असताना Ranbir Kapoor आणि Arijit Singh एकमेकांसमोर झाले नतमस्तक, सुपरस्टार्सच्या कृत्याचे होतेय कौतुक

Ranbir Kapoor And Arijit Singh: नुकताच चंदीगडमध्ये अरिजीत सिंगचे कॉन्सर्ट पार पडले. यावेळी रणबीर कपूरने हजेरी लावली

Priya More

Ranbir Kapoor-Arijit Singh Video:

आपल्या मधूर आवजाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अरिजीत सिंहचा (Arijit Singh) फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठा चाहता वर्ग आहे. अरिजीतचे कॉन्सर्ट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. अरिजीतच्या कॉन्सर्टचे तिकीट कितीही महाग असले तरी देखील त्याचे चाहते तिकीट खरेदी करत मोठी गर्दी करतात. नुकताच चंदीगडमध्ये अरिजीत सिंगचे कॉन्सर्ट पार पडले.

या कॉन्सर्टला रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) हजेरी लावली. यावेळी रणबीरला पाहून चाहते खूपच आश्चर्यचकीत झाले. यावेळी एनिमल स्टार रणबीर आणि अरिजीत यांनी कॉन्सर्टमध्ये जबरदस्त धम्माल केली. या दोघांच्या एका व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रणबीर कपूरने कॉन्सर्टमध्ये आल्यानंतर अरिजीत सिंगसमोर गुडघे टेकून त्याला नतमस्तक केले. त्यानंतर अरिजीत सिंगने देखील रणबीर कपूरसमोर गुडघे टेकून त्यालाही नतमस्तक केले. दोन्ही सुपरस्टारने एकमेकांचा आदर करत सलाम केला. दोघांचा एकमेकांबद्दल असलेला आदर पाहून कॉन्सटर्सला उपस्थित असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला त्यांना प्रचंड आनंद झाला. या दोन सुपरस्टार्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स आणि चाहत्यांकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे. या दोन्ही सुपरस्टार्सच्या कृत्याचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

सोशल मीडियावर अरिजीत आणि रणबीरचे व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्स कमेंटस करत त्यांचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'लग्नानंतर रणबीर खूपच बदलला आहे. साधेपणा इथे विकला जातो.' दुसऱ्याने लिहिले की, 'एकच हृदय आहे. किती वेळा जिंकणार रणबीर आणि अरिजीत.' तिसऱ्याने लिहिले की, 'लग्नानंतर रणबीरचे वागणे पूर्णपणे बदलले आहे.' आणखी एकाने लिहिले की,'हे खूप सुंदर आहे.'

रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात नुकतेच 'सतरंगा' हे रोमँटिक गाणे रिलीज झाले. या गाण्याला अरिजीत सिंहने आवाज दिला आहे. हे गाणं या वर्षातील सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची रणबीर आणि रश्मिकाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT