Actor Mithun Chakraborty Health Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mithun Chakraborty Health Update: 'मी आता पूर्णपणे बरा आहे', मिथुन चक्रवर्तींना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींची प्रकृती पूर्णपणे बरी असून ते रुग्णालयातून घरी गेले आहेत. लवकरच ते त्यांच्या अपकमिंग चित्रपटाच्या शूटिंगच्या कामाला सुरूवात करणार असल्याचे बोलले जात आहे.

Priya More

Mithun Chakraborty Discharged From Hospital:

बॉलिवूडचे (Bollywood) 'डिस्को डान्सर' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या (Mithun Chakraborty) चाहत्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी असून ते रुग्णालयातून घरी गेले आहेत. लवकरच ते त्यांच्या अपकमिंग चित्रपटाच्या शूटिंगच्या कामाला सुरूवात करणार असल्याचे बोलले जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना १० फेब्रुवारीला छातीमध्ये दुखत असल्यामुळे कोलकाता येथील अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोक झाले होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अशामध्येच त्याच्यावर व्यवस्थित उपचार करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना रुग्णालयातून आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती एकदम ठीक आहे. असे सांगितले जात आहे की, ते लवकरच त्यांच्या अपकमिंक चित्रपटाच्या शूटिंग सुरू करणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, मिथुन आता पूर्णपणे ठीक असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णालयातून बाहेर पडताना मिथुन चक्रवर्ती यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. बघू, मी लवकरच कामाला सुरुवात करू शकतो आणि कदाचित उद्यापासूनच.' त्यांनी पुढे सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन करून प्रकृती विचारपूस केली होती. प्रकृतीची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे ते ओरडले होते.' दरम्यना, पद्मभूषण पुरस्कार विजेते मिथुन यांनी हिंदी, बंगाली, ओरिया, भोजपुरी आणि तमिळ भाषेतील सुमारे 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT