Kartik Aaryan And Tara Sutaria Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan Video: सारा नाही तर तारा! या अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन?, मिठी मारतानाचा VIDEO व्हायरल

Kartik Aaryan And Tara Sutaria Video: अनन्या पांडे असो की जान्हवी कपूर. क्रिती सेनॉननंतर त्याचे नाव सारा अली खानसोबत जोडले गेले होते. आता त्याचे नाव नव्या अभिनेत्रीसोबत जोडले गेलेय.

Priya More

Kartik Aaryan And Sara Sutaria:

बॉलिवूडचा (Bollywood) हँडसम हंक कार्तिक आर्यन त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्यावर लाखो तरुणी फिदा आहेत. कार्तिक आर्यन त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. कार्तिकचे नाव त्याच्यासोबत चित्रपटामध्ये काम केलेल्या अभिनेत्रींसोबत अनेकदा जोडले जाते.

अनन्या पांडे असो की जान्हवी कपूर. क्रिती सेनॉननंतर त्याचे नाव सारा अली खानसोबत जोडले गेले होते. सारासोबतची डेटिंग आणि नंतर ब्रेकअपच्या बातम्यानंतर आता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) एका नव्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांच्या डेटिंगच्या अफवांना शनिवारी रात्री वेग आला जेव्हा ते डिनर डेटनंतर एकत्र दिसले. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करून दोघेही बाहेर आले आणि आपापल्या कारमध्ये बसण्यापूर्वी दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये हे कपल कैद झाले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर नेटिझन्स देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेस्टॉरंटबाहेर येताच कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया यांना पापाराझींनी घेरलं. कॅमेऱ्यांना पाहून ताराने पळ काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या कारमध्ये बसण्यापूर्वी ताराने कार्तिकला मिठी मारली. त्यानंतर कार्तिकने ताराला तिच्या कारमध्ये बसवले आणि तो तिथून निघून गेला. आता या कपलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स त्यावर अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कार्तिक आर्यनने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या ड्रेसिंगमध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. तर ताराने काळ्या रंगाचा टॉप आणि लेपर्ड प्रिंट स्कर्ट घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

खरं तर, कार्तिक आणि तारा हे दोघेही 'आशिकी 3' या चित्रपटात एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. कार्तिक आणि तारा हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. दरम्यान, 'आशिकी 3'चे शूटिंग जानेवारी 2024 च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कार्तिक आर्यनने नुकताच 'चंदू चॅम्पियन'चे शूटिंग पूर्ण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT