Hritik Roshan And Saba Azad Saba Azad
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan ने गर्लफ्रेंड Saba Azad सोबत सेलिब्रेट केली दिवाळी, फॅमिली फोटो केला शेअर

Hritik Roshan Celebrate Diwali With Saba Azad: अभिनेत्याने स्वत: आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

Priya More

Hritik Roshan And Saba Azad:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. हृतिक रोशन सध्या सबा आझादला डेट करत आहे. हे कपल बऱ्याचदा अनेक ठिकाणी स्पॉट झाले आहे. कधी हॉटेलबाहेर तर कधी कुटुंबीयांसोब इन्जॉय करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल होत असतात. या कपलच्याबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात. दोघेही लग्न करणार असल्याबाबत देखील अनेक वृत्त समोर आले आहे.

याचदरम्यान हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिवाळी सेलिब्रेशन केल्याचे फोटो समोर आले आहेत. अभिनेत्याने स्वत: आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांचे कौतुक करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतो. नुकताच हृतिक रोशनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॅमिलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हृतिक रोशनच्या कुटुंबासोबतच त्याची गर्लफ्रेंड सबा आझादही या फोटोंमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सबा आझाद देसी लूकमध्ये दिसत आहे. तर हृतिक रोशन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हृतिक रोशन आणि सबाने कुटुंबीयांसोबत एकत्र दिवाळी सेलिब्रेट केल्याचा हा फोटो आहे.

हृतिक रोशनने फॅमिली फोटो शेअर करत 'Happy Diwali beautiful people', असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हृतिक आणि सबा यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हृतिकच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी सबा आणि त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. त्याचसोबत चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे. हृतिकच्या या पोस्टला १२ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

या फोटोंवर कमेंट्स करत हृतिक आणि सबाच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले आहेत. तर दुसरीकडे काही नेटिझन्सनी सबाला ट्रोल देखील केले आहे. एका युजरने लिहिले की, 'सबा आझादला ड्रेसिंगची अक्कल नाही.' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'सबाच्या जागी सुझैन असायला हवी होती.' याशिवाय अनेक यूजर्स सबा आझाद आणि हृतिक रोशनच्या जोडीला मिसमॅच म्हणताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT