मनोरंजन बातम्या

Aditi Rao Hydariने बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत गुपचूप केलं लग्न, तेलंगणातील मंदिरात घेतले सात फेरे

Priya More

Aditi Rao Hydari Wedding:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने गुपचूप लग्न केल्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीने नुकताच लाँग टाइम बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थसोबत गुपचूप लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न श्री रंगनायकस्वामी मंदिरात झाले. सध्या दोघांवर देखील त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सिद्धार्थ आणि आदिती खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये असल्याच्या देखील चर्चा होत्या. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. पण त्यांनी आपल्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा केली नव्हती. आज 27 मार्च रोजी आदिती आणि सिद्धार्थ यांनी तेलंगणातील एका मंदिरात लग्न केले. वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगपूरमधील श्री रंगनायकस्वामी मंदिरामध्ये दोघांनी सात फेरे घेतले. नातेवाईक आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये दोघांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केले असल्याचे सांगितले जात आहे.

2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू आणि तमिळ चित्रपट 'महा समुद्रम'मध्ये आदिती आणि सिद्धार्थने एकत्र काम केले होते. आदिती आणि सिद्धार्थ अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. एवढेच नाही तर दोघेही एकत्र सुट्ट्या इन्जॉय करताना दिसले आहेत. दोघेही अनेक सोशल मीडिया रिल्समध्ये एकत्र दिसले आहेत. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडायचे नाही.

दरम्यान, अदितीचे पहिले लग्न 2009 मध्ये सत्यदीप मिश्रासोबत झाले होते. काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर 2013 मध्ये दोघे वेगळे झाले. सिद्धार्थचेही हे दुसरे लग्न असेल. सिद्धार्थचे पहिले लग्न 2003 मध्ये झाले होते. 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. सिद्धार्थ लवकरच कमल हासन यांच्या इंडियन २ मध्ये दिसणार आहे. तर आदिती राव हैदरी लवकरच संजय लीला भन्साली यांच्या हिरामंडी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT