Aamir Khan And Darsheel Safary Saam Tv
मनोरंजन बातम्या

'तारे जमीन पर'नंतर पुन्हा एकत्र येणार Aamir Khan आणि Darsheel Safary, १६ वर्षानंतर बदलला 'टीचर-स्टुडंट'चा लूक

Aamir Khan And Darsheel Safary: २००७ मध्ये रिलीज झालेल्या आमिर खान आणि दर्शील सफारी यांचा चित्रपट 'तारे जमीन पर'ला प्रेक्षकाकंडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मागच्या वर्षी आमिर खानने या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली.

Priya More

Aamir Khan And Darsheel Safary:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान (Aamir Khan) मोठ्या पडद्यापासून बरीच वर्षे दूर आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha Movie) या चित्रपटामध्ये तो शेवटचा दिसला होता. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर- खान मुख्य भूमिकेत होती. सध्या आमिर खानच्या हातामध्ये अनेक प्रोजेक्ट आहेत. यामधील काही चित्रपटांमध्ये तो स्वत: दिसणार आहे. तर काही चित्रपटची निर्मिती तो स्वत: करणार आहे.

२००७ मध्ये रिलीज झालेल्या आमिर खान आणि दर्शील सफारी यांचा चित्रपट 'तारे जमीन पर'ला प्रेक्षकाकंडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मागच्या वर्षी आमिर खानने या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली. अशामध्ये आता दर्शील सफारीने आमिर खानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर नेटकरी या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याचा अंदाज लावत आहेत.

दर्शील सफारीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन कोलाज फोटो शेअर केले आहेत. यामधील पहिल्या फोटोमध्ये आमिर खान आणि दर्शील सफारी २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटातील एक सीन आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दर्शील सफारी तरुण आणि आमिर खान म्हातारा दिसत आहे. दोन्ही फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे.

दर्शील सफारीने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बूम! १६ वर्षानंतर पुन्हा आम्ही एकत्र आलो आहोत. थोडे इमोशनल पण सर्वात जास्त चार्ज. या अनुभवासाठी माझ्या मेंटॉरला खूप सारे प्रेम. चार दिवसांनंतर मोठया खुलाश्यासाठी तयार राहा.' दर्शीलच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, ४ दिवसांनंतर तारे जमीन पर च्या सीक्वलची अपडेट येणार आहे.

दरम्यान, आमिर खानने २०३३ या वर्षामध्ये एका कार्यक्रमादरम्यान घोषणा केली होती की, माझी प्रमुख अभिनेता म्हणून पुढचा चित्रपट 'सितारे जमीन पर' असणार आहे. आता दर्शील सफारीने आमिर खानसोबतचा फोटो शेअर केल्यामुळे आता हे दोन्ही कालाकार पुन्हा स्क्रिन शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे. दर्शीलने सांगितल्याप्रमाणे ४ दिवसांनंतर नेमका काय धमाका होणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT