Pathaan 17th day collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan 17th Day Collection: 'पठान' लवकरच गाठणार विक्रमी आकडा, अब की बार ५०० पार

'पठान' चित्रपट लवकरच भारतात ५०० करोडचा आकडा पार करेल यात शंका नाही.

Pooja Dange

Pathan 17th Day Box Collection: शाहरुख खान, दीपिका आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'पठान'ने अनेक रेकॉर्ड बनविले आहेत. तसेच अनेक रेकॉर्ड मोडीत काढून इतिहास रचला आहे. भारतासह विदेशातही या चित्रपटाने जोरदार बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

'पठान' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच आहे चित्रपट वादात सापडला होता. परंतु शाहरुख खानच्या फॅन्सनी त्याला उत्तम साथ दिली. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना ही एक चांगली चपराक होती.

४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर आलेला शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली. या चित्रपटाचा प्रवास अजूनही सुरूच आहे. 'पठान' चित्रपटाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे.

'पठान' चित्रपटाला प्रदर्शित होऊन १७ दिवस उलटून गेले आहेत. हा या चित्रपटाचा तिसरा वीकेंड आहे. हा या वीकेंड 'पठान' किती कमाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

१७ दिवसानंतर देखील 'पठान' चित्रपटाची क्रेझ कायम आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे. सैकनिल्कच्या अहवालानुसार 'पठान'ने १७व्या दिवशी ५ करोडचे कलेक्शन केले आहे.

तिसऱ्या शुक्रवारची कलेक्शन लक्षात घेता 'पठान'ने आतापर्यंत फक्त भारतात ४६३.९० करोडची कमाई केली आहे. शनिवार आणि रविवारी चित्रपट आणखी चांगली कमाई कारे असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच भारतात ५०० करोडचा आकडा पार करेल यात शंका नाही.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाने ४५० करोडचा आकडा पार करत दंगल, केजीएफ २, द काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटाचं रेकॉर्ड मोडला आहे. लाक्वरच हा चित्रपट जभरात १००० करोडचा टप्पा पार करेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT