Laal Singh Chaddha Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Netflix Top 10 Movies: सिनेमागृहात नाही, ओटीटी वर 'लाल सिंग चड्ढा'ने मारली बाजी

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने टॉप 10 च्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. आमिर खानला बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवता आले नसले तरी ओटीटीवर तो पहिल्या स्थानावर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट (Movie) ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. मात्र प्रेक्षकांनी आमिर खानचा या चित्रपटाला नापसंती दर्शवली होती. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने टॉप 10 यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

लाल सिंग चड्ढा यांनी जगातील अनेक देशांच्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. पण नेटफ्लिक्स इंडियाच्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट अजूनही टॉपला आहे. आमिर खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) गल्ला जमवू शकला नाही. परंतु ओटीटीवर (OTT) 'लाल सिंग चड्ढा' चांगला परफॉर्म करत आहे.

वायाकॉम 18 स्टुडिओ प्रस्तुत, अद्वैत चंदन दिग्दर्शित, आमिर खान प्रॉडक्शनच्या 'लाल सिंग चड्ढामध्ये' आमिर खान, करीना कपूर खान, मोना सिंग, नागा चैतन्य अक्किनेनी आणि मानव विज हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. लाल सिंग चड्ढा 6 ऑक्टोबर 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. (Aamir Khan Kareena Kapoor Movie)

नेटफ्लिक्सच्या टॉप 10 चित्रपटांच्या या यादीत 'लाल सिंग चड्ढा' पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर 'प्लॅन ए प्लॅन बी' (Plan A Plan B) असून तिसऱ्या क्रमांकावर, लकीएस्ट गर्ल अलाइव्ह चौथ्या क्रमांकावर, ओरु तेक्कन तालू केस पाचव्या, रंगा रंगा वैभवंगा सहाव्या क्रमांकावर, शाकिनी डाकिनी सातव्यावर, दंगलुनरू आठव्या, हिट: द फर्स्ट केस आणि आरआरआर हिंदीचा समावेश आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप १० यादीमध्ये या चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Maharashtra Live News Update : 'भाजप लोकांची घरं फोडून राजकारण करतं'- उद्धव ठाकरेंचा घणाघात

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

SCROLL FOR NEXT