The Kashmir Files Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kashmir Files 2: 'द कश्मीर फाइल्स 2' चित्रपट होणार 'या' तारखेला प्रदर्शित

2023 च्या मध्यापर्यंत काश्मीर फाइल्सचा दुसरा भाग येईल, असे विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट (Movie) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. सुमारे 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ सिनेमागृहातून 340 कोटींची कमाई केली होती. काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची कहाणी मांडणाऱ्या या चित्रपटाने सर्वांनाच हादरवून सोडले आणि तेव्हापासून या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार असा प्रश्नही विचारला जात आहे.

आजही काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ (Video) शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'खोऱ्यात काश्मिरी पंडितांची सातत्याने हत्या होत आहे, पण स्वतःला हिंदूंचे ठेकेदार म्हणवणारे सरकार झोपले आहे. सततच्या हत्या, अत्याचार याने त्यांना फरक पडत नाही. गोष्टी खूप वाईट होत आहेत. काश्मिरी पंडित ९० च्या दशकातील संकटातून जात आहेत.

हे ट्विट रिट्विट करत श्रेयांश त्रिपाठीने विवेक अग्निहोत्रीला (Vivek Agnihotri) टॅग केले आणि विचारले – विवेक अग्निहोत्री यावर काश्मीर फाइल्स बनवू शकेल का? यानंतर विवेक अग्निहोत्रीने ट्विटला उत्तर दिले जे करोडो यूजर्सना अपेक्षित आहे. विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे की – होय, काम सुरू आहे. 2023 च्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागेल.

म्हणजेच 2023 च्या मध्यापर्यंत काश्मीर फाइल्सचा दुसरा भाग येईल, असे विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या समस्या देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आजही काश्मीरमधून पंडितांच्या हत्या आणि गैरवर्तनाच्या बातम्या (News) येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

Wedding Shopping : आली लगीन सराई....लग्नासाठी शॉपिंग करताय? मग मुंबईतील या प्रसिध्द ठिकाणी नक्कीच जा

Historical Places In Maharashtra : अहिल्यानगरमधील 'या' किल्ल्यावर झाली इतिहासातील महत्त्वाची लढाई, लहान मुलांसोबत नक्की जा

SCROLL FOR NEXT