Indian 2 Intro Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Indian 2 And Sarfira Collection : 'सरफिरा'ला मागे टाकत 'इंडियन २' ची बॉक्स ऑफिसवर बाजी, कमाईचा आकडा किती?

Indian 2 And Sarfira Box Office Collection : 'इंडियन २' आणि 'सरफिरा' असे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले आहेत. दोन्हीही चित्रपटांनी रिलीजच्या पहिल्याच विकेंडला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Chetan Bodke

बॉक्स ऑफिसवर प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर 'कल्की २८९८ एडी'ची जोरदार कमाई सुरू असताना आणखीन दोन चित्रपट रिलीज झालेले आहेत. 'इंडियन २' आणि 'सरफिरा' असे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले आहेत. दोन्हीही चित्रपटांनी रिलीजच्या पहिल्याच विकेंडला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केलेला आहे.

'इंडियन २' आणि 'सरफिरा' हे दोन्हीही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. असं असलं तरीही हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करताना दिसत आहेत. कमल हसन स्टार 'इंडियन २' चित्रपट १२ जुलैला थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. चित्रपटाने रिलीज होताच दमदार कमाई सुरू केली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत ४२ कोटींची कमाई केलेली आहे. या चित्रपटामध्ये टॉलिवूडमधील अनेक तगडी स्टारकास्ट आहे.

तर अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपटही बॉक्स ऑफिसवर १२ जुलैलाच रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून समीक्षकांनीही चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे. चित्रपटाने दोन दिवसांत ७ कोटींची कमाईचा आकडा गाठला आहे. अक्षय कुमार, राधिका मदान, सीमा बिस्वास, परेश रावल अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये टॉलिवूड अभिनेता सुर्या सुद्धा दिसणार आहे. त्याने चित्रपटामध्ये, कॅमिओ रोल साकारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadgola Benefits : ताडगोळे फळ कधी खाल्ले आहे का? चमत्कारी फायदे वाचाल तर आताच खरेदी कराल

Maharashtra Live News Update : आखाती युद्धाचा परिणाम, मनमाड शहरात एकमेव असलेला गोगॅस पंप झाला ड्राय

Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT