Bad Newz Poster Instagram
मनोरंजन बातम्या

विकी कौशलच्या ‘Bad Newz’ने एका आठवड्यात किती कमावले ? जाणून घ्या एकूण कमाई...

Bad Newz Collection : विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. एक आठवड्यापूर्वीच रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Chetan Bodke

विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. एक आठवड्यापूर्वीच रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. जाणून घेऊया, चित्रपटाच्या एक आठवड्याच्या कमाईबद्दल...

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टच्या माहितीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ४३ कोटींची कमाई केलेली आहे. पहिल्या विकेंडला उत्तम कमाई केल्यानंतर इतरत्र दिवशी कमाईचा आकडा फार कमी दिसला. पहिल्या दिवशी ८.३ कोटी, दुसऱ्या दिवशी १०.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ११.१५ कोटी, चौथ्या दिवशी ३.५ कोटी, पाचव्या दिवशी ३.७५ कोटी, सहाव्या दिवशी ३.१५ कोटी तर सातव्या दिवशी जेमतेम २.८५ कोटींची कमाई केलेली आहे. कमाईचा आकडा हा दिलासादायक असून निर्मात्यांना चित्रपटाच्या कमाई आकडा आणखी वाढण्याची इच्छा आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, विकी कौशलच्या हिट चित्रपटांच्या यादीमध्ये ‘बॅड न्यूज’ चित्रपटाचाही समावेश झालेला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून चाहते कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करीत आहेत.

चित्रपटाला मिळत असलेला दमदार प्रतिसाद पाहून विकी कौशलसोबतच चित्रपटाच्या इतर टीमलाही आनंद गगनात मावेनासा झालाय. विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचं 'तौबा तौबा' हे गाणे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही टॉप करत होते. ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्यातील धमाल कॉमेडी पाहून प्रेक्षकांच्या मनातील चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली होती.

इशिता मोईत्रा आणि तरुण दुडेजा यांनी लिहिलेला 'बॅड न्यूज' हा २०१९ च्या 'गुड न्यूज' फ्रेंचाइजी चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सलोनी बग्गा (तृप्ती डिमरी) हीच्या पोटात जुळी मुली आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे या मुलांना एक नाही तर दोन वडील (विकी आणि एमी) आहेत. आता या दोघांपैकी ती आपल्या मुलाचा बाप म्हणून कोणाची निवड करणार, याभोवतीच ही कथा फिरतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT