katrina kaif and vickey kaushal yandex
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif And Vickey Kaushal: बॉलिवूडचं पॉवर कपल कतरिना कैफ अन् विकी कौशलमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? संपत्तीचा आकडा ऐकून म्हणाल तौबा तौबा

Katrina Kaif,Vickey Kaushal Net Worth: बॅलिवूड इंडस्ट्रीमधील कतरिना आणि विकी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनवीन चित्रपट घेऊन येत असतात. सर्व चाहत्यांची विकी-कतरिना एक फेवरेट जोडी आहे. बॅलिवूडमधील या कपलची कमाई चाहत्यांना थक्क करण्यासारखी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कतरिना कैफ बॅलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. कतरिना नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगवेगळे चित्रपट घेऊन येत असते. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि चांगल्या स्वभावाने सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या बॅलिवूडमधील कतरिना कैफला कोणत्याच ओळखीची गरज नाही आहे. कतरिना कैफने खूप यश मिळवून स्वत:चे बॅलिवूड इंटस्ट्रीमध्ये हक्काचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्रीने नमस्ते लंडन, वेलकम, पार्टनर, रेस, सिंग इज किंग, एक था टाइगर यांसारखे अनेक चित्रपटात काम केले आहेत. त्याचबरोबर कतरिनाने चित्रपटसृष्टीत आपले यश मिळवून स्वत:ची जबरदस्त फॅन फॅालोइंग वाढवली आहे. सोशल मिडियावर सुद्धा कतरिना कैफ चाहत्यांसाठी नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

बॅलिवूड इंडस्ट्रीमधील कतरिना कैफने आपली लग्नगाठ अभिनेता विकी कौशलशी बांधली आहे. विकी कौशल हा बॅलिवूडमधील एक उत्तम अभिनेता आहे. विकीच्या दमदार अभिनयाने आणि हटके स्टाइलने सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. चित्रपटसृष्टीतले त्याचे काम पाहून चाहते नेहमीच विकी कौशलचे कौतुक करत असतात. विकी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनवीन चित्रपट घेऊन येत असतो. त्याचबरोबर तो चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका सुद्धा साकारताना पाहायला मिळत असतो. सध्या हे क्यूट कपल सोशल मिडियावर खूप चर्चेत आहे. पण बॅलिवूडमधील या कपलने अफाट संपत्ती कमावली आहे. आज त्यांची ही कमाई सर्वांना थक्क करण्यासारखी आहे. त्याचबरोबर त्या नवरा-बायकोमध्ये कोण जास्त श्रीमंत आहे , हे आपल्याला आज या बातमीतून समजणार आहे.

बॅलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ एका चित्रपटासाठी सुमारे १५ ते २० कोटी रुपये घेत असते. त्याचबरोबर कतरिना कॅफची सोशल मिडियावर खूप फॅन फॅालोइंग असल्याने ती सोशल मिडिया पोस्टसाठी कंपनीकडून १ कोटी रुपये घेते. कतरिना एका जाहिरातीसाठी ६ कोटी रुपये घेते. त्याबरोबर कोणत्या कार्यक्रमात परफॅार्म करण्यासाठी कतरिना ३.५ कोटी रुपये घेत असते. अभिनेत्रीचा स्वत:चा 'के ब्यूटी' नावाचा कॅास्मेटिक ब्रँड सुद्धा आहे. याबरोबर दमदार अभिनय असलेला विकी कौशल एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये घेतो. त्याचबरोबर विकी कौशल प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी ५० ते ६० लाख रुपये कमवत असतो. अभिनेता विकी प्रोजक्टसाठी ७ ते १० कोटी रुपये घेतो.

बॅलिवूडमधील कतरिनाकडे मुंबईच्या वांद्रे परिसरात 3BHK अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटची सुमारे किंमत ८.१० कोटी रुपये आहे. अभिनेत्रीकडे लोखंडवालामध्ये १३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. कतरिनाच्या लंदनमधील घराची किंमत ७ कोटी रुपये आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीला लक्झरी वाहनांची आवड असून तिच्याकडे ऑडी क्यू 3, ऑडी क्यू 7, मर्सिडीज एमएल 350 आहे. बॅलिवूडमधील कतरिना कैफ २२४ कोटी रुपयांची मालक आहे. त्याबरोबर विकी कौशलकडे ४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पण कतरिना नवरा विकी कौशलपेक्षा जास्त संपत्तीची मालकिण आहे. बॅलिवूड इंडस्ट्रीमधील या क्यूट कपलकडे एकूण २६५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT