Mister Mummy Trailer Instagram@riteishd
मनोरंजन बातम्या

Mister Mummy Trailer Out: 'आई तू बाबा मी' हास्याचे फवारे उडवणाऱ्या 'मिस्टर मम्मी'चा ट्रेलर प्रदर्शित

'मिस्टर मम्मी' ची कथा एका जोडप्याभोवती फिरते, ज्यांची मुलांबद्दल पूर्णपणे भिन्न विचारसरणी आहे आणि दोघेही गर्भवती होतात. अशा परिस्थितीत पुरुष गरोदर राहिल्यास काय होईल हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mister Mummy Trailer: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia Dsouza) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'तेरे नाल लव हो गया' नंतर दोघे आता 'मिस्टर मम्मी' या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकताच 'मिस्टर मम्मी'चा हास्याचे फवारे उडवाणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये संपूर्ण कॉमेडी पाहायला मिळत आहे. शाद अली दिग्दर्शित 'मिस्टर मम्मी' चित्रपट कॉमेडीने भरलेला असून पोटधरुन हसवणार हे नक्की. (Bollywood Films)

'मिस्टर मम्मी' ची कथा एका जोडप्याभोवती फिरते (रितेश आणि जेनेलिया) ज्यांची मुलांबद्दल पूर्णपणे भिन्न विचारसरणी आहे आणि दोघेही गर्भवती होतात. अशा परिस्थितीत पुरुष गरोदर राहिल्यास काय होईल हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. विचित्र कथा असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. चित्रपटात रितेश अमोल या विलक्षण पीटी शिक्षकाची भूमिका साकारत आहे, तर जेनेलिया त्याची पत्नी गुग्लूची भूमिका साकारत आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येईल की या सिनेमात रितेश-जिनिलिया यांच्यासोबत अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. महेश या सिनेमात एक डॉक्टर दाखवण्यात आले आहे. याशिवाय राकेश बेदीही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.दरम्यान, दुसरी महिलाही तेथे पोहोचते आणि तिच्या गर्भधारणेशी संबंधित समस्या सांगते.

यावर रितेश म्हणतो की, त्यालाही अशाच सर्व समस्यांचा सामना करावा लागत आहे, तेव्हा महेश त्याला सांगतो की तू प्रेग्नंट आहेस? यानंतर, कथा हळूहळू पुढे जाते आणि रितेश पत्नी जेनेलियासह गर्भवती होतो. अशा परिस्थितीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून प्रेक्षकवर्गात ट्रेलर पाहून एकच हश्या पिकेल हे नक्की.

शाद अली दिग्दर्शित, शिव अनंत आणि शाद अली निर्मित 'मिस्टर मम्मी' टी-सीरीज 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. नुकतेच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनीही त्यांच्या 'वेड' या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'वेड' या चित्रपटातून जेनेलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, तर दिग्दर्शक म्हणून रितेशचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT