Shaitaan 1st Day Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Shaitaan 1st Day Collection: अजय देवगण-आर माधवनचा ओपनिंग डेलाच धुमाकूळ, 'शैतान'ने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई

Chetan Bodke

Shaitaan 1st Day Box Office Collection

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Actor Ajay Devgn) आणि आर. माधवनचा (Actor R Madhvan) 'शैतान' चित्रपट (Shaitaan Movie) अखेर काल अर्थात ८ मार्चला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हॉरर आणि थ्रिलर 'शैतान' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशीच दमदार कमाई करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

'शैतान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा आकडा गाठला आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल १४ कोटींची कमाई केली आहे. ह्या कमाईच्या आकड्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अद्याप निर्मात्यांकडून कमाईचा आकडा जाहीर झालेला नाही. ॲडव्हान्स कमाईमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि सुपरनॅच्युरल थ्रिलर आधारित हा चित्रपट आहे. अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिकाने चित्रपटामध्ये खूप दमदार अभिनय केला आहे. चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हा गुजराती चित्रपट 'वश'चा रिमेक आहे. चित्रपटाची कथा जादूटोणा आणि वशिकरणावर आधारित आहे. सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर आर. माधवन शैतानाच्या भूमिकेत आहे. साऊथ अभिनेत्री ज्योतिकाने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आपल्या कुटुंबाला काळ्या जादूपासून वाचवताना दिसणार आहे. शैतान अर्थात आर. माधवन अजय देवगणच्या कुटुंबीयांवर कशी काळी जादू करतो. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'शैतान' चित्रपटाची निर्मिती जवळपास ६० ते ६५ कोटींच्या बजेटमध्ये झालेली आहे. या चित्रपटाला ओपनिंग डेलाच प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विकास बहल यांनी याआधी 'क्वीन', 'चिल्लर पार्टी' आणि 'सुपर ३०' असे चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT