Misson Majnu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Misson Majanu: १९७१ चे युद्ध पुन्हा अनुभवता येणार, 'मिशन मजनू' मधील रश्मिका- सिद्धार्थच्या बेधडक लूकने सर्वांचेच वेधले लक्ष

भारत- पाकिस्तान बॉर्डरवर अनेकदा युद्ध झालेले आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून तरी का होईना प्रेक्षकांना भारत- पाकिस्तानमधील युद्ध पाहता आले होते.

Chetan Bodke

Misson Majanu: १९४७ मध्ये भारत- पाकिस्तान एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. भारताचा पुर्वाश्रमीचा शत्रु म्हणजे पाकिस्तान. आता पर्यंत भारतात अनेक भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धांवर अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. भारत- पाकिस्तान बॉर्डरवर अनेकदा युद्ध झालेले आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून तरी का होईना प्रेक्षकांना भारत- पाकिस्तानमधील युद्ध पाहता आले होते. त्यातीलच एक सर्वात जास्त चर्चेत असलेले युद्ध म्हणजे १९७१ चे.

या युद्धावर भाष्य करणारा एक चित्रपट म्हणजे 'मिशन मजनू'. नुकताच या चित्रपटाचा टीझर नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धाने सुरुवात होते. पाकिस्तान भारताचा बदला घेण्यासाठी अणुहल्ल्याची कशी योजना आखत आहे, हे दिसत आहे.

१९७१ मध्ये पाकिस्तान तिसऱ्यांदा भारतासोबतच्या युद्धात हरला होता. पाकिस्तानकडे भारतावर हल्ला करण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे अणुहल्ला. पण त्यांना RAW च्या क्षमतेची कल्पना नव्हती. ही कथा एका शूरवीराची आहे ज्याचे नाव इतिहासाच्या पानात नोंदवलेले नाही.

यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राने टीझरमध्ये ट्रेनमधून उडी मारत असतानाच्या सीनने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. सोबतच त्याच्यासोबत रश्मिका मंदानाही दिसत आहे. रश्मिका यात नववधु दिसत असून ती एका पाकिस्तानी मुलीच्या भूमिकेत आहे. हे दोघेही कलाकार मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाचा टीझर नुकताच शेअर करण्यात आला असून हा चित्रपट येत्या २० जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli News: गडचिरोलीत पोलिसांनी कट उधळला, पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ बॉम्बस्फोट

Pakistan Air Pollution : वायू प्रदुषणामुळे पाकिस्तानात आणीबाणी, तब्बल 20 लाख लोकांची प्रकृती बिघडली, लाहोरमधला आकडा धक्कादायक

Screenshot ला मराठीत काय म्हणतात? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर

KVP Yojana: खुशखबर! या योजनेत गुंतवलेले पैसे होणार डबल, गुंतवणूदारांना फायदाच फायदा; योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

VIDEO : मोदींना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल | Marathi News

SCROLL FOR NEXT