Dunki Twitter Review Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki Twitter Review: किंग खानच्या ‘डंकी’ची नेटकऱ्यांमध्ये तुफान क्रेझ; प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटला?

Dunki Film: ‘जवान’प्रमाणेच ‘डंकी’ सुद्धा हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार अशी नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Dunki Twitter Review

राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट आज (२१ डिसेंबर) ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. शाहरुखचा हा २०२३ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. ‘पठान’, ‘जवान’नंतर शाहरुखचा हा ‘डंकी’ तिसरा चित्रपट आहे.

‘जवान’प्रमाणेच ‘डंकी’ सुद्धा हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार अशी नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु असून देशभरामध्ये चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो सकाळचाच आहे. चला तर जाणून घेऊया नेटकऱ्यांनी चित्रपटाबद्दल कशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नुकताच एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर) युजरने चित्रपटाचा रिव्ह्यू व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेक्षक म्हणतात, चित्रपट खूपच सुंदर आहे, चित्रपटामध्ये शाहरुखसह सर्वांचाच अभिनय खूप सुंदर आहे. तुम्हीही हा चित्रपट एकदा पाहावा. अशी एकाने प्रतिक्रिया दिली. सर्वच प्रेक्षकांनी शाहरुखच्या अभिनयाचे पुन्हा एकदा कौतुक केला आहे. सोबतच नेहमीप्रमाणे त्याच्या गाण्यांवरही प्रेक्षक थिरकताना दिसत आहेत. सोबतच अनेक युजर्सने राजकुमार हिराणी यांच्यासोबत चित्रपटाच्या कथानकाचेही कौतुक केले जात आहे. (Bollywood Film)

अनेक युजर्सने या चित्रपटाला ४ स्टार्स दिले आहेत. तर काही युजर्सने चित्रपटाला ३.५ इतके स्टार्स दिलेले आहेत. फक्त भारतातच नाही तर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशामध्येही चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. इतर देशातही प्रेक्षकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. ‘पठान’ आणि ‘जवान’ प्रमाणेच ‘डंकी’ची ही प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. शाहरुखचा चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर प्रेक्षकांसाठी हा एक सणाप्रमाणेच दिवस असतो. असाच आजचाही अनेक चाहत्यांसाठी दिवस आहे. (Bollywood)

या चित्रपटाच्या माध्यमातून राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान हे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ‘डंकी’मध्ये मुख्य भूमिकेत शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

SCROLL FOR NEXT