Ajay Devgan And Rohit Shetty Instagram/ @ajaydevgn
मनोरंजन बातम्या

Ajay Devgan: अजयची चाहत्यांना गुड न्यूज, नव्या वर्षाचे निमित्त साधत केली 'या' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा...

नववर्षाचे निमित्त साधत बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याच्या एका चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.

Chetan Bodke

Ajay Devgan: २०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी फारच वाईट होते. मोजक्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केली. त्यातच आता २०२३ मध्ये कोणकोणते चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करणार? असा सवाल सर्वांनाच पडला आहे. नववर्षाचे निमित्त साधत बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याच्या एका चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.

२०२२ मध्ये त्याचा 'सर्कस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा फ्लॉप झाला होता. विनोदावर आधारित असलेल्या या चित्रपटाने इतकी खास कमाई केली नव्हती. अजयच्या 'दृश्यम २' ने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. त्यातच आता सर्वच 'सिंघम' च्या सिक्वेलसाठी उत्सुक आहेत. अजयने चाहत्यांना नववर्षाच्या शुभमुहूर्तावर ही गुड न्युज दिली आहे. अक्षयने पोस्टसोबतच त्याचा आणि अक्षयचा एकत्र फोटो शेअर केला आहे.

त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "रोहित शेट्टीसोबत 'सिंघम अगेन'च्या कथानकाने नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. मी कथा ऐकली असून मला फार आवडली आहे. देवाच्या इच्छेनुसार हा आमचा ११वा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल." या कॅप्शनमुळे अक्षयने त्याच्या चाहत्यांचे त्याने मन जिंकले आहे. सिंघमचा पुढील भाग कधी पर्यंत प्रदर्शित होणार याची कल्पना अद्याप तरी दिग्दर्शकांनी दिलेली नाही.

२०११ मध्ये सिंघमचा पहिला भाग तर २०१४ मध्ये सिंघमचा दुसरा भाग 'सिंघम रिटर्न्स' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २०२३ मध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगण चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सोबतच चित्रपटात अजयसोबत दीपिकाही दिसणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

SCROLL FOR NEXT