Adipurush 4th Day Box Office Collection Twitter
मनोरंजन बातम्या

Adipurush 4th Day Collection: ‘आदिपुरूष’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई घटली, चौथ्या दिवसाची कमाई निव्वळ इतकीच...

Adipurush Collection: समीक्षकांसह प्रेक्षकांनीही चित्रपटाला तुफान ट्रोल केलं असलं तरी, चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड कायम आहे. पण चित्रपटाची चौथ्या दिवसाची कमाई खूपच कमी झाली आहे.

Chetan Bodke

Adipurush 4th Day Box Office Collection: ‘आदिपुरूष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील संवाद, चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि व्हिएफएक्समुळे अनेक हिंदू संघटनांनी चित्रपटावर आक्षेप घेतला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही चित्रपटाला तुफान ट्रोल केलं असलं तरी, चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड कायम आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली असली तरी सोमवारी या चित्रपटाने खूपच कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया सोमवारी केलेल्या कमाईबद्दल....

प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, देवदत्त नागे, सनी सिंह हे कलाकार प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाने जगभरात पहिल्या दिवशी १४० कोटींच्या घरात कमाई केली होती. तर ८६. ७५ कोटींची कमाई भारतात झाली आहे. तर दुसऱ्या दिवशी भारतात या चित्रपटाने ६५. २५ तर तिसऱ्या दिवशी ६९.१ कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी चित्रपटाने केवळ २० कोटींचीच कमाई केली आहे.

पहिल्याच विकेंडला धमाकेदार कमाई केलेल्या ‘आदिपुरूष’ने चौथ्या दिवशी कमाईच्या बाबतीत खूपच मार खाल्लेला दिसून येत आहे. चित्रपटाने एकट्या भारतात जवळपास २४१ कोटींची कमाई केली होती तर, जगभरात ३०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केलेली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ची कथा मनोज मुंतशरने लिहीली आहे. सोशल मीडियासह सर्वत्र चित्रपटाला नेटिझन्स ट्रोल करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

SCROLL FOR NEXT