72 Hoorain Special Screening At JNU University Saam Tv
मनोरंजन बातम्या

72 Hoorain Screening At JNU: जेएनयू कॅम्पसमध्ये होणार ‘72 Hoorain’चे स्पेशल स्क्रीनिंग, नवा वाद उफाळण्याची शक्यता

72 Hoorain Film Controversy: जेएनयूमध्ये स्पेशल स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सध्या चित्रपटाचे निर्माते बरेच चर्चेत आहे.

Chetan Bodke

72 Hoorain Special Screening At JNU University: गेल्या काही दिवसांपूर्वी ‘72 Hoorain’चा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज केला होता. ट्रेलर प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कॅम्पसमध्ये या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. जेएनयूमध्ये स्पेशल स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सध्या चित्रपटाचे निर्माते बरेच चर्चेत आहे.

जेएनयू विद्यापीठाच्या इतिहासावरून असे दिसते की, जेएनयू कॅम्पसमध्ये ज्यावेळी वास्तविक जीवनावर आधारित कोणतेही चित्रपट प्रदर्शित केले गेले, तेव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा वाद निर्माण झालाच आहे. जर विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘72 Hoorain’ दाखवला गेला तर वाद उफाळण्याची शक्यता अधिक आहे. निर्मात्यांना सर्वच गोष्टींची पुर्वकल्पना असूनही घोषणा केली की, हा चित्रपट ४ जुलै रोजी जेएनयू कॅम्पसमध्ये प्रदर्शित करणार आहे.

जेएनयूमध्ये चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगबद्दल निर्मात्यांचं मत आहे, चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्याचे कारण म्हणजे, विद्यापीठातील काश्मिरी मुस्लिम आणि इतर विद्यार्थ्यांसाठी चित्रपटात दाखवलेल्या दहशतवादी घटनांच्या सत्याबाबत व्यक्त होण्याची सुवर्णसंधी देणार आहे. विद्यार्थी चित्रपटात दाखवलेल्या सत्य घटनांवर बोलते होतील. ‘72 Hoorain’ सिनेमाचं JNU मध्ये प्रदर्शन म्हणजे दहशतवादासारख्या गंभीर विषयावर खुल्या संवादाचा एक उत्तम मार्ग मानला पाहिजे.

काश्मीरमधील काही राजकीय पक्षांनी चित्रपटात दाखवलेल्या दहशतवाद्यांच्या मानसिक छळाच्या दृश्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. चित्रपटात मांडलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे विशिष्ट धर्माबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि सामाजिक जडणघडणीवर विपरित परिणाम होईल, असे या राजकीय पक्षांचे मत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आपला धर्म अन्यायकारकपणे मांडला जाईल, अशी भीती या राजकीय पक्षांना आहे.

‘72 Hoorain’ ७ जुलै २०२३ रोजी देशातील चित्रपटगहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पुरण सिंग चौहान यांनी केले आहे. गुलाबसिंग तंवर, किरण डागर, अनिरुद्ध तन्वर यांनी एकत्रित येऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अशोक पंडित चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT