Sharman Joshi On 3 Idiots Sequel  Saam Tv
मनोरंजन बातम्या

3 Idiots Sequel: गुड न्यूज! शर्मन जोशीने ‘३ इडियट्स’च्या सिक्वेलबद्दल दिली महत्वाची अपडेट, म्हणाला, ‘काळजी करू नका. लवकरच....’

3 Idiots Sequel News: लवकरच ‘३ इडियट्स’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती शर्मन जोशीने दिली आहे.

Chetan Bodke

Sharman Joshi On 3 Idiots Sequel: मित्रांवर चित्रित करण्यात आलेला ‘३ इडियट्स’ चित्रपटाची आज प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची कथा, चित्रपटातील संवाद आणि गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लवकरच ‘३ इडियट्स’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट शर्मन जोशीने दिली आहे. शर्मन जोशीने चित्रपटात राजू हे पात्र साकारले.

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याने चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. ‘३ इडियट्स’चा सिक्वेलबद्दल शर्मन जोशी म्हणतो, “चित्रपटाच्या सिक्वेलसाठी राजू सर फारच उत्सुक आहेत. सध्या ते चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत. तुम्ही काळजी करू नका लवकरच कथा पूर्ण झाली की आम्ही त्या कथेवर आम्ही काम करू.” असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांना महत्वाची अपडेट दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शर्मन जोशीने अमीर खान आणि आर. माधवन सोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी ‘३ इडियट्स’चा सिक्वेल येणार अशी एक प्रेक्षकांना हिंट दिली होती. पण ते तिघेही शर्मनच्या आगामी ‘काँग्रॅज्युलेशन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते.

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर, बोमन इराणी, ओमी वैद्य आणि मोना सिंग हे कलाकार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT