Fateh Movie Released Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fateh Movie : सोनू सूदने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट, 'फतेह'बद्दल केली महत्वाची घोषणा

Fateh Release Date : कोरोना काळात अनेकांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदचा आज ५१ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याने वाढदिवशी चाहत्यांसोबत 'फतेह' चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे.

Chetan Bodke

कोरोना काळात अनेकांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदचा आज ५१ वा वाढदिवस आहे. सोनूने बॉलिवूडमध्ये अभिनय, डान्स आणि ॲक्शनच्या माध्यमातून प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले. लवकरच सोनूचा 'फतेह' चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सोनूने दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू केले आहे. आज अभिनेत्याने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिले आहे. अभिनेत्याने आज 'फतेह' चित्रपट चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या बहुचर्चित चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. सोनूने या चित्रपटात अभिनयही केला असून दिग्दर्शनही केले आहे. सोनूने 'फतेह' चित्रपटाची रिलीज डेट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आहेत. या चित्रपटात सोनू सूदसोबत मुख्य भूमिकेत जॅकलिन फर्नांडिस ही दिसणार आहे. नवीन पोस्टर आणि काही खास BTS फोटो पोस्ट करून अभिनेत्याने रिलीज डेट सांगितली. 'फतेह' चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

सूदने पोस्ट टाकताच चाहत्यांनी त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा देत कौतुकाचा वर्षाव केला आहे. तो म्हणाला की ही कथा "महत्त्वपूर्ण" आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, 'फतेह' मध्ये सूद नसीरुद्दीन शाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सोनू सूदचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारा ‘फतेह’ सायबर क्राइमच्या वास्तविक जीवनातील घटनां वर आधारित असून झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट भारतीय कलाकारांना त्याच्या ॲक्शन सीक्वेन्ससह पर्वणी देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT