Sunny Leone instagram
मनोरंजन बातम्या

Sunny Leone: सनी लिओनी दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो तुफान व्हायरल

Sunny Leone: सनी लिओनी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री सनी लिओनी १३ वर्षानंतर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॅलिवूडमधील सनी लिओनी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सनीने नेहमीच अनेक रिअॅलिटी शो होस्ट केले आहेत. सध्या ही अभिनेत्री तिच्या दुसऱ्यांदा लग्न केल्यामुळे फार चर्चेत आली आहे. तिने पुन्हा एकदा आपले लग्न पती डॅनियल वेबरसोबत केले आहे. सनी लिओनीचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. सध्या या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर लग्नाचे सुंदर फोटो शेअर होत आहे. चाहत्यांनी सुद्धा या सुंदर कपलचे खूप कौतुक केले आहे.

सनी लिओनीने आपली पहिली लग्नगाठ ९ एप्रिल २०११ मध्ये डॅनियल वेबरसोबत बांधली होती. त्यांचा हा लग्नसोहळा रितीरिवाजानुसार आनंदात पार पडला होता. आता या क्यूट कपलला तीन मुले आहेत. सनी आणि डॅनियलने त्यांचा हा दुसऱ्यांदा लग्न करण्यचा सोहळा मुलांच्या साक्षीने पार पाडला आहे. या लग्नसोहळ्यात त्यांची तिन्ही मुले सामील होती. सनी आणि डॅनियलने त्यांचे लग्न मालदीवमध्ये केले आहे. यामध्ये सनी लिओनीने पांढऱ्या रंगाचा गाउन घातला आहे, तर डॅनियलने सुद्धा सनीला मॅचिंग होईल असा पांढरा शर्ट आणि ट्राऊजर पँट घातली आहे. या लग्नसोहळ्यात दोघेही खूप सुंदर दिसत आहे.

सनी लिओनी आणि डेनियल वेबर त्यांच्या लग्नगाठीत खूप खुश दिसत आहे. या लग्नगाठीसोबत सनीने तिच्या पतीसोबत पुन्हा एकत्र सोबत राहण्याची शपथ घेतली आहे. त्यांचे हे लग्न त्यांचा तिन्ही मुलांना पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. याबरोबर मुलांच्या चेहऱ्यावर त्यांच्या आई-बाबांच्या लग्नाचा खूप आनंद दिसत आहे. सनीने लिओनीचे म्हणणे आहे की, लग्न केल्यामुळे नात्यात अजून प्रेम वाढते, त्याचबरोबर आपल्याला जोडीदाराचे महत्त्व देखील समजते. या क्यूट कपलने त्यांचा हा मालदीवमधील लग्नसोहळा पारंपारिक पद्धतीने पार पाडला आहे. याबरोबर त्यांनी सुंदर असे फोटोशूट सुद्धा केले आहे.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT