deepika yandex
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: बॉलिवूडची 'लेडी सिंगम' आहे कोट्यवधींची मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Deepika Padukone Net Worth: दीपिका पादुकोण बॅलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने अनेक चित्रपटात काम केले असून तिच्या दमदार अभिनयाचे वेड सर्व प्रेक्षकांना लावले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॅलिवूडची दीपिका पादुकोण एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री दीपिका बॅलिवूड इंटस्ट्रीमध्ये स्टार कलाकार आहे. दीपिकाने तिच्या उत्तम अभिनयाने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या सुंदर सौंदर्याने सर्वांना आपले वेड लावले आहे. अभिनेत्रीने बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले हक्काचे स्थान मिळवले आहे. आता दीपिकाला कोणत्याच ओळखीची गरज नाहीये. दीपिका नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन चित्रपट घेऊन येत असते. त्याचबरोबर दीपिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत आहे. सोशल मिडियावर दीपिका चाहत्यांसाठी नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले असून, तिच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांची खूप पंसती मिळाली आहे. पण अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. म्हणून आज जाणून घेऊया बॅलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची एकूण कमाई.

अभिनेत्री बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये टॅाप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दीपिकाने बाजीराव मस्तानी , पद्मावत, चेन्नई एक्सप्रेस, पठान, यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत. अभिनेत्री दीपिका एका चित्रपटासाठी १५ ते ३० कोटी रुपये घेत असते. दीपिकाची चित्रपट निर्मिती, ब्रँड एंडोर्समेंटसह अनेक कंपन्यामध्ये गुंतवणूक आहे. अभिनेत्री अनेक ब्रँडच्या जाहिराती करुन ७ ते १० कोटी रुपये कमवत असते. दीपिका पादुकोणची एका महिन्याची कमाई तीन कोटींपेक्षा जास्त आहे. दीपिका एका एंडार्समेंटमधून ८ कोटी रुपये कमवत असते. अभिनेत्रीचे Levi's, Dyson,Asian Paints, Jio यांसारखे मोठे ब्रँड देखील आहेत. याबरोबर अभिनेत्रीने अनेक ब्युटी प्रोडक्ट्स आणि फॅशन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक सुद्धा केली आहे.

अभिनेत्रीची अनेक ठिकाणी खूप मालमत्ता आहे. दीपिकाचे मुंबईमधील प्रभादेवी परिसरात १६ कोटी रुपयांचे अलिशान घर आहे. त्याचबरोबर दीपिकाचे मुंबईमध्ये अनेक फ्लॅट आहेत. याबरोबर दीपिकाकडे अनेक महागड्या ब्रँडच्या बॅग सुद्धा आहेत. संपूर्ण एक एक बॅगची किंमत ७ ते ८ लाख रुपये आहे. अभिनेत्री कोणत्याही शो मध्ये डान्स करण्यासाठी १ कोटी रुपये घेत असते. दीपिकाकडे अनेक लक्झरी गाड्या सुद्धा आहेत. त्या महागड्या गाड्यांमध्ये Audi A8L, Mini Copper Convertible,Audi Q7,Mercedes-Maybach s500 आहे. या सर्व लक्झरी गाड्यांची किंमत सुमारे १ कोटी किंवा ८० लाखांपर्यत असेल. बॅलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे एकूण ५०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT