arjun kapoor  instagram
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor: दमदार अभिनय अन् हटके स्टाइल स्टार अर्जुन आहे धनाढ्य, संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क

Arjun Kapoor Net Worth: अर्जुन कपूर बॅलिवूडमध्ये एक लोकप्रिय अभिनेता आहे. अर्जुन कपूरने आता पर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. अभिनेता अर्जुन त्याच्या दमदार अभिनयामुळे आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये अर्जुन कपूर एक प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनेता अर्जुन नेहमीच त्याच्या दमदार अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकत असतो. अर्जुन कपूरने त्याच्या उत्तम कामगिरीमुळे बॅलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्जुनचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अर्जुन नेहमीच चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहायला मिळतो. अभिनेता अर्जुन सोशल मीडियावर देखील खूप चर्चेत असतो. सध्या हा अभिनेता त्याच्या दमदार यशामुळे कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अर्जुनची संपत्ती सर्वांना थक्क करण्यासारखी आहे. जाणून घेऊया अर्जुन कपूरची एकूण संपत्ती.

अर्जुन कपूरने 'इशकजादे' चित्रपटातून बॅलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले पदार्पण केले. अभिनेता अर्जुनेन गुंडे, नमस्ते लंडन, एक व्हिलन रिटर्न, हाफ गर्लफ्रेंड यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत.अभिनेता अर्जुन एका चित्रपटासाठी ६ ते ८ कोटी रुपये घेतो. अर्जुन कपूरने आता पर्यंत १८ चित्रपट केले आहेत. याशिवाय अभिनेता सोशल मीडिया, इव्हेंट्स, ब्रँड एंडोर्समेंट सारख्या माध्यामातून पैसे कमवत असतो. अर्जुन कपूर फेसवॅाश, हेअर ऑइल आणि परफ्यूम अशा अनेक ब्रँडच्या जाहिराती करतो. एका जाहिरातीसाठी अर्जुन कपूर ५०-६० लाख मानधन घेतो. याबरोबर अर्जुन ब्रँड एंडोर्समेंटमधून १ कोटी रुपये कमवतो. अर्जुन कपूरच्या अनेक ठिकाणी मालमत्ता देखील आहेत. मुंबईत अलिशान घर आहे. याबरोबर अर्जुनने वांद्रे येथे फ्लॅट खरेदी केला आहे. याबरोबर त्याच्याकडे सी- फेसिंग ४ बीएचके फ्लॅट आहे, ज्याची किंमत साधारण ३३ कोटी रुपये आहे.

बॅलिवूडमध्ये लोकप्रिय असणाऱ्या अर्जुन कपूरला लक्झरी वस्तूंची आणि महागड्या कारची खूप आवड आहे. अर्जुनकडे भव्य असे कार कलेक्शन आहे. त्याच्याकडे मर्सिडीज एमएल 350 आणि मासेराती लेवांटे आहे. त्याच्या मर्सिडीज एमएल 350 ची किंमत ६७.६० कोटी रुपये आहे, तर मासेराती लेवांटे ची किंमत सुमारे १.६४ कोटी रुपये आहे. याबरोबर अर्जुनच्या रेंज रोव्हर डिफेंडर कारची किंमत सुमारे ९३. ३५ लाख रुपये आहे. त्याच्याकडे व्होल्वो XC90 कार आहे, ज्याची किंमत सुमारे १.३० कोटी रुपये आहे. याप्रकारे अर्जुन आज त्याच्या यशामुळे ९२ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT