Rakhi Sawant Hilarious Mannat For Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Mannat: राखीने खास भाईजानसाठी मागितली मन्नत, आता तरी सलमानचं लग्न होईल का?

Rakhi Sawant Viral Video: नुकतंच राखीने बॉलिवूडच्या भाईजानसाठी एक मन्नत मागितली आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant Hilarious Mannat For Salman Khan: बॉलिवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. तिच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. राखी नेहमीच पापाराझींसमोर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. ती अनेकदा पापाराझींसमोर मजेशीर पद्धतीने बोलताना आणि त्यांच्यासोबत गप्पा मारताना आपल्याला दिसते. तिची ही हटके स्टाईल पाहून काहींना हसायला येतं तर काहींना राग येतो. यावेळी राखी पुन्हा एकदा एका हटक्या कृत्यामुळे चर्चेत आली आहे.

नुकतीच राखी विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाली. नुकतंच राखीने बॉलिवूडच्या भाईजानसाठी एक मन्नत मागितली आहे. तिच्यातील आणि सलमानमधील विशेष नातं सर्वांनाच ठाऊक आहे. तिने सलमानचं लग्न व्हावं यासाठी एक विशेष मन्नत मागितली आहे. सध्या राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ने नुकताच हा व्हिडीओ शेअर केला आहे. राखीचा हा व्हिडीओ विमानतळावरील असून तिने आपले डोकं ब्लेझरने झाकलेले दिसत आहे. विमानतळावर राखीने गुलाबी रंगाच्या ब्लेझरने डोके झाकले असून ती अनवाणी पायाचीच चालत आहे, असे दिसत आहे. पापाराझींसोबत संवाद साधताना राखी म्हणते, “मी नवस केलाय. सलमान खानने लग्न करावं. मी श्रीलंका, दुबई येथून विना चप्पल आली आहे. जोपर्यंत सलमानचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही.”

राखीच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत म्हणतात, ‘म्हणजे राखी मरेपर्यंत चप्पल घालणार नाही.’, तर आणखी एक युजर म्हणतो, ‘राखी वेडी झालीय, ती उगाच काहीही करत बसते.’, तर काही युजर्सने त्या व्हिडीओवर हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. अशा संमिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी राखीला दिल्या आहेत.

नुकतंच काही दिवसांपूर्वी, राखीने तिचा एक्स नवरा आदिलपासून घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्रीने ब्रेकअप पार्टीचे आयोजन केले होते. ब्रेकअप पार्टीतील व्हायरल व्हिडिओमध्ये राखीने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता.

तिने यावेळी लाल रंगाचा लेहंगा घालून नाचताना दिसली. तेव्हा तिने पापाराझींसमोर आनंद व्यक्त करताना दिसली. ती म्हणाली होती की, मी शेवटी घटस्फोट घेत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी होतात पण मी आनंदी आहे.

राखी सावंतचे लग्न आदिल खानसोबत झाले होते. लग्नानंतर तिने आदिलवर अनेक आरोप केले होते, त्यानंतर त्याला ७ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. राखीने आदिलवर विवाहबाह्य संबंधाचा आरोपही केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT