Dil Bechara 2 Announcement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dil Bechara 2 Announcement: सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा सिक्वेल येणार, मुख्य भूमिकेत कोण दिसणार ?

Dil Bechara Sequel Announcement: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर 'दिल बेचारा'चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची माहिती स्वत: दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी दिली आहे.

Chetan Bodke

Dil Bechara 2 Announcement

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) 'दिल बेचारा' (Dil Bechara) हा अखेरचा चित्रपट ठरला. हा चित्रपट जुलै २०२० ला ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra) यांनी केले असून या चित्रपटाला चाहत्यांनी ओटीटीवर खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अभिनेत्याच्या निधनानंतर चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची माहिती स्वत: दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी दिलेली आहे.

'दिल बेचारा'ची कथा जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन आवर स्टार्स' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबत संजना सांघी ही प्रमुख भूमिकेत होती. मुकेश छाब्रा यांनी ट्वीटर (एक्स)वर 'दिल बेचारा २' असं लिहित ट्वीट शेअर केलं आहे. मुकेश छाब्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चित्रपटाच्या कास्टिंग किंवा कथेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सुशांतची जागा कोण घेणार ? याची जोरदार चर्चा होत आहे.

'दिल बेचारा' या चित्रपटामध्ये, सुशांत सिंह राजपूतला शेवटचं पाहून चाहते भावूक झाले होते. डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. IMDB रेटिंगमध्ये या चित्रपटाला १० पैकी ९.८ रेटिंग मिळाले आहेत. २४ तासाच्या आत चित्रपटाला ९५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले होते. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सुशांत सिंह राजपूतसोबत, सैफ अली खान आणि संजना सांघीने चित्रपटात लीड रोल साकारला होता. २०१९ मध्ये 'दिल बेचारा'चं शूटिंग झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT