Ranbir Kapoor And Alia Bhatt Bought New Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir And Alia Bought New Car : रणबीर कपूर-आलिया भट्टने खरेदी केली अलिशान कार, किंमत वाचून व्हाल थक्क

Ranbir Kapoor And Alia Bhatt Bought New Car : बॉलिवूडचं स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्टने नुकतीच नवी कोरी लक्झरियस कार खरेदी केली आहे. सध्या सोशल मीडियावर नव्या कारचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचं स्टार कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) दोघंही त्यांच्या अभिनयासह लक्झरीयस लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या लक्झरियस अपार्टमेंटची चर्चा सुरू होती. या कपलने एप्रिल महिन्यात नवी कोरी कार खरेदी केली होती. आता त्यानंतर या कपलने नवी कोरी लक्झरियस कार खरेदी केली आहे. त्यामुळे हे कपल सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आलेले आहे.

सध्या सोशल मीडियावर आलियाच्या नव्या कारचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आलिया- रणबीरने नुकतीच Lexus LM ही नवी कार खरेदी केली आहे. त्यांच्या ह्या नव्या कारची किंमत तब्बल २.५० ते ३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. आलिया- रणवीरने खरेदी केलेल्या ह्या नव्या कारचे इंटिरियर्स, हायब्रीड सिस्टीम, ॲडव्हान्स शॉक एब्जॉर्बर्स, ॲडवान्स सेफ्टीसह अनेक वैशिष्ट्य आहेत.

आलिया- रणवीरने एप्रिलमध्ये बेंटले कॉन्टिनेंटल जीटी V8 कार तर त्यापूर्वी रेंज रोव्हर कार विकत घेतली होती. दोघांच्याही लक्झरियस लाईफस्टाईलची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड पार्टीमध्ये किंवा स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान आलियाच्या फॅशनची जोरदार चर्चा होते. सध्या रणबीरच्या कामाबद्दल सांगायचे तर, तो 'रामायण' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. तर आलियाही 'जिगरा' आणि 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT