Kiara-Sidharth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kiara-Sidharth : लक्ष्मी आली! सिद्धार्थ बाप झाला, कियारानं दिला गोंडस मुलीला जन्म

Kiara Advani-Sidharth Malhotra Welcome Baby Girl : बॉलिवूड कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा झाले आहेत. कियाराने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Shreya Maskar

मनोरंजन सृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे पावर कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा झाले आहेत. कियाराने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कियारा (Kiara Advani) आणि सिद्धार्थच्या (Sidharth Malhotra ) घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. त्यांना मुलगी झाली आहे. सध्या कियारा-सिद्धार्थवर चाहते , कलाकार सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला काल (15 जुलै)ला बाळ झाले आहे. कियाराने गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. कियारा आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप कियारा आणि सिद्धार्थने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सिद्धार्थ-कियाराने फेब्रुवारी महिन्यात एक पोस्ट करून लवकरच आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती.

लग्नगाठ

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने 2023 मध्ये लग्नगाठ बांधली. प्रेग्नन्सी दरम्यान अनेक वेळा कियारा आणि सिद्धार्थचे हॉस्पिटलमध्ये जातानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. कियारा आणि सिद्धार्थने 2021 साली रिलीज झालेल्या 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले आहे. चित्रपटाच्या सेटवर यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. यांची शाही थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. कियारा बेबी बंपसह 'मेट गाला 2025'च्या रेड कार्पेटवर झळकली. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वर्कफ्रंट

कियारा अडवाणी आता लवकरच 'वॉर 2'मध्ये झळकणार आहे. 'वॉर 2' 14 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर सिद्धार्थ मल्होत्रा 'परम सुंदरी' चित्रपटात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT