Bipasha Basu and Karan Grover Bless With Baby Girl Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bipasha Basu-Karan Grover: बिपाशा ४३ व्या वर्षी झाली आई, लग्नाच्या सहा वर्षांनी दिली गुडन्यूज

बिपाशा आणि करण यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bipasha-Karan Bless With Baby Girl: बिपाशा बसू आणि कारण ग्रोव्हर यांनी १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार बातमी शेअर केली होती. तेव्हापासून दोघेही त्यांच्या जीवनातील प्रत्येक अपडेट त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिपाशा बासू आणि कारण ग्रोव्हर यांना मुलगी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

रणबीर आणि आलियानंतर बिपाशा आणि करण यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. हे वृत्त समजताच बिपाशा आणि कारणवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फॅन्स आणि सेलिब्रिटी या दोघांचे अभिनंदन करत आहेत. आता ही जोडी सुद्धा पॅरेन्ट क्लबमध्ये सहभागी झाली आहे. या बाळाच्या जन्मानंतर बिपाशा आणि करांचे झाले आहे. (Actor)

प्रेगन्सीदरम्यान बिपाशाने तिच्या चाहत्यांसोबत सोशल सर्व अपडेट शेअर करत होती. बिपाशाने मॅटर्निटी फोटोशूट देखील केले होते. तसेच या शूटचे फोटो सुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचबरोबर या जोडप्याने बेबी शॉवर समारंभ देखील साजरा केला होता. त्यात त्यांनी त्यांच्या काही खास मित्र-मैत्रिणींना देखील बोलावले होते. (Social Media)

बिपाशा आणि कारण यांचे लग्न २०१६मध्ये झाले होते. लग्नाच्या ६ वर्षानंतर या जोडप्याच्या आयुष्यात एक छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मुलीच्या येण्याने बिपाशा आणि करण यांचे जीवन अजूनच सुंदर झाले असेल यात शंकाच नाही. या बेबी गर्लला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बिपाशा आणि करण त्यांच्या मुलीचा चेहेरा कधी दाखवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT