Bollywood Celebs 2024 New Year Celebration Instagram
मनोरंजन बातम्या

बॉलिवूडचे New Married Couples निघाले New Year Celebration ला, सिंपल लूकने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

New Year Celebration: २०२३ मध्ये लग्नगाठ बांधलेले सेलिब्रिटी नववर्षाच्या स्वागतासाठी परदेशामध्ये रवाना झालेले आहेत.

Chetan Bodke

Bollywood Celebs 2024 New Year Celebration

२०२३ वर्ष संपायला आता अवघे काही तासच उरले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सामान्यांपासून सेलिब्रिटी मंडळी ही फारच उत्सुक आहेत. २०२३ मध्ये लग्नगाठ बांधलेले सेलिब्रिटी नववर्षाच्या स्वागतासाठी परदेशामध्ये रवाना झालेले आहेत. शनिवारी अरबाज-शशुरासह रणदीप-लिन विमानतळावर स्पॉट झाले होते. यावेळी दोन्हीही कपलच्या लूकची नेटकऱ्यांनी जोरदार कौतुक केले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, अरबाजने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट तर शूराने राखाडी को-ऑर्डर सेट परिधान केला होता. अरबाज आणि शशुरा यांचा निकाह २४ डिसेंबर रोजी अरबाजची बहीण अर्पिता खान शर्माच्या मुंबईतल्या घरी पार पडला.

आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत या दोघांनीही आयुष्याची नवीन सुरुवात केली. तर रणदीप आणि लिनने ही सिंपल लूक केलेला पाहायला मिळाला. मल्टीकलरचा शर्ट, राखाडी कलरची पँट आणि लिनने नेस्टल हिरव्या रंगाचा शर्ट, व्हाइट क्रॉप टॉप आणि व्हाइट पँट असा तिने लूक केला होता. त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली होती.

अरबाज- शुरासोबत रणदीप आणि लिन यांचाही एअरपोर्ट लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अरबाजने त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या शूरा खानसोबत दुसरे लग्न केले. अरबाजची बहीण अर्पिताच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला.

अरबाज आणि शूरा एकमेकांशी लग्न करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये येत होत्या. मात्र अरबाज आणि त्याच्या कुटुंबीयांना याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. त्यामुळे हे वृत्त खरं आहे की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता.

अशामध्ये अरबाजने २४ डिसेंबरला लग्न करत चाहत्यांना आश्चर्यचकीत केले. तर रणदीप आणि त्याची गर्लफ्रेंड लिनबद्दल सांगायचे तर, लिन मणिपूरची रहिवासी आहे. ती पेशाने भारतीय मॉडेल असून दोघांमध्ये १० वर्षांचा फरक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

SCROLL FOR NEXT