Nysa Devgan's Name Pronunciation Saam TV
मनोरंजन बातम्या

Nysa Devgan's Viral Video: आता माझी सटकली, चुकीचं नाव घेतल्याने सिंघमची मुलगी संतापली

Nysa Devgan Video: नीसा देवगणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Nysa Devgan's Name Pronunciation: बॉलिवूडचे स्टार कपल पैकी एक म्हणजे अजय देवगण आणि काजोल. या दोघांना युग आणि नीसा ही दोन मुलं आहेत. नीसा अनेकदा इव्हेंटमध्ये, मित्रांसोबत स्पॉट होत असते. स्टार कीड स्टारपेक्षा काही कमी नाहीत. त्यामुळे नीसा तिच्या आई-वडिलांप्रमाणे नेहमीच चर्चेत असते.

काजोलच्या लाडक्या मुलीच्या बॉलिवूड डेब्यूची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र नीसाला इतक्या लवकर अभिनय जगताचा भाग व्हायचे नाही. नीसा तिच्या जीवनाचा खूप आनंद घेत आहे.

तिला त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करणे आणि प्रवास करणे आवडते. त्यामुळे ती मीडियाच्या कॅमेऱ्यातही कैद होते. नीसा पुन्हा एकदा तिच्या बेस्ट फ्रेंड ओरीसोबत दिसली आहे. (Latest Entertainment News)

नीसा देवगणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नीसा तिच्या मित्रांसोबत कारच्या दिशेने जाताना दिसत आहे. जिथे पापाराझी तिला न्यासा-न्यासा म्हणत आहेत. आधी नीसा शांतपणे ऐकून गाडीत बसते. पण कारचा दरवाजा बंद करण्यापूर्वी ती पापाराझीला सांगते की माझे नाव नीसा आहे. हे ऐकल्यानंतर फोटोग्राफर पुन्हा तिला वेगळ्याच नावाने बोलू लागतात.

त्यावर नीसाने हसून कारचा दरवाजा बंद करते. काजोलही अनेकदा मुलीचे नाव चुकीच्या पद्धतीने घेत असे. आता नीसाने स्वत: सांगितल्यानंतर अनेकांचे गैरसमज दूर झाला असेल.

नीसा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. काजोल आणि अजय मुलीबाबत विचारले असता, अजयने सांगितले, नीसा आता शिकत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT