Bollywood Celebrity Saam TV
मनोरंजन बातम्या

Happy Fathers Day : बॉलिवूड कलाकारांचा फादर्स डे; बापमाणसाला दिल्या भरभरून शुभेच्छा

Bollywood Father's Day Celebration : सेलिब्रिटी देखील वडिलांचे त्यांच्या आयुष्यातील महत्त्व सांगत फादर्स डे निमित्त पोस्ट करत आहेत.

Pooja Dange

Bollywood Celebrity Share Post On Father's Day : आज फादर्स डे आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी देखील वडिलांचे त्यांच्या आयुष्यातील महत्त्व सांगत फादर्स डे निमित्त पोस्ट करत आहेत. चला तर पाहूया कलाकारांनी त्यांच्या जीवनातल्या बाप माणसाला कश्या शुभेच्छा दिल्या आहेत ते.

करण जोहर

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करणने त्याच्या मुलांच्या आणि आई वडिलांच्या फोटोंचा वापर केला आहे. फादर्स दे निमित्त पोस्ट केलेल्या व्हिडिओला करणने खूप सुंदर कॅप्शन दिले आहे.

त्याने लिहिले आहे की, मला मिळालेला सर्वात मोठे आशीर्वाद, माझी सर्वात मोठी ताकद, माझे सर्वात मोठे समीकक्षक आणि मी जे काही करतो त्यामागे असलेले सर्वात मोठी कारण. मला रुही आणि यशचे वडील बनवल्याबद्दल धन्यवाद! डॅडा तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि धन्यवाद बाबा, मार्गदर्शक होईन मला रास्ता दाखवल्याबद्दल. आज जर मी माझ्या मुलांसाठी तुमच्यासारखं निम्मा जरी करू शकलो तर मी हा माझा सर्वात मोठा विजय मानेन.

बिपाशा बासू पोस्ट

बिपाशा बासूने करण सिंग ग्रोव्हरला फादर्स डच्या शुभेच्या दिल्या आहेत. काही महिन्यापूर्वी या दोघांच्या घरी 'देवी'चा जन्म झाला. बिपाशाने करण आणि देवीचा व्हिडिओ शेअर करत करणचे कौतुक केले आहे.

बिपाशाने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे, 'ज्या दिवशी आम्ही गरोदर राहिलो देवीच्या वडिलांचा देखील जन्म झाला. असा एकही दिवस गेला नाही जेव्हा करण माझ्या पोटातअसलेल्या बाळाशी बोलले नाही किंवा त्याने गाणे गायले नाही. आणि ती जन्मली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक दिवशी, मी या गोड मॅजिकल क्षणाची साक्षीदार आहे. हे वडिलांचे प्रेम.

देवी ही सर्वात नशीबवान मुलगी आहे जिला सर्वात अमेझिंग वडील, तिचे बाबा आहेत. फक्त त्याच्या आवाजाने तिचे डोळे उघडतात. पप्पांशिवाय मजा नाही … खाणे, खेळणे, आंघोळ करणे, मसाज टाइम, टेरेस टाइम , डिप्पी डिप्पी टाइम, डुलकी- पप्पा नेहमी सर्वकाही खूप मस्त करतात.

आम्ही तुमच्यावर प्रेम करतो बाबा. तुम्ही आमचे सर्वस्व आहात. खूप गोड असल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पहिल्या फादर्स डेच्या शुभेच्छा!' (Latest Entertainment News)

करिष्मा कपूर आणि करीना कपूर

तर अभिनेत्री बहिणी करिष्मा कपूर आणि करीना कपूर यांची देखील फादर्स डेच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. करिष्माने वडील रणधीर कपूरसोबत फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ज्या माणसाने मला दयाळूपणा, प्रेम आणि सर्व काही शिकवले (चांगले अन्न आणि उत्तम अन्न यातील फरक देखील)'. 'हॅपी फादर्स डे'

तर करीना कपूरने तिचा आणि सैफ अली खानचा फोटो शेअर करत 'इतर सर्वांपेक्षा कूल, फादर्स डेच्या शुभेच्या गोड माणसा', असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत सारा अली खानने सैफ अली खानला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

Silent Health Warning: सकाळी उठताच थकवा आणि पोट फुगल्यासारखे वाटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

SCROLL FOR NEXT