Bollywood Celebrity Ganpati 2025 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Celebrity Ganpati 2025 : सलमान खान ते रितेश देशमुख; बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरचा गणराया, पाहा PHOTOS

Bollywood Celebrity Ganpati Photos : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी लाडक्या गणपतीचे आगमन झाले आहे. गणरायाचे सुंदर फोटो पाहा.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या घरी देखील गणेशाचे स्वागत करण्यात आले.

काल (27) ऑगस्ट गणेश चतुर्थीला सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी देखील गणपतीचे धुमधड्याक्यात स्वागत करण्यात आले आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood Celebrity Ganpati 2025) लाडक्या गणरायाची झलक पाहा.

अनन्या पांडे

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने आपल्या लाडक्या गणपतीसोबत फोटो शेअर केले आहेत.

मृणाल ठाकूर

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे.

गोविंदा

गोविंदा आणि सुनीताच्या घरीही लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. तेव्हा ते एकत्र दिसले. त्यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाच्या चर्चा अफवा असल्याचे सांगितले. आम्हाला दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. वरून देव किंवा सैतान आला तरी आम्हाला एकमेकांपासून दूर केलं जाऊ शकत नाही, असं सुनीतानं सांगितलं

सोनू सूद

सर्वांना मदतीसाठी हात देणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरचा गणपती पाहा.

जॅकलिन फर्नांडिस

आपल्या स्टाइल आणि लूकने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या घरी देखील गणपती आला आहे.

शर्वरी वाघ

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने देखील वाजत गाजत गणपतीचे स्वागत केले आहे. तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

करीना कपूर

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने देखील गोंडस गणपतीचा फोटो शेअर केला आहे.

अर्जुन बिजलानी

टिव्हीचा फेमस अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारी गणपतीची सुंदर मूर्ती आहे.

रितेश देशमुख

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या घरी एका खास अंदाजात गणपतीचे स्वागत करण्यात आले आहे. रोबोटिक-गेमिंग थीम पाहायला मिळत आहे.

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने गणपतीची मनोभावे आरती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आरपीआयची मागणी

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT