Bollywood Celebrity Childhood Photo  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Celebrity Childhood Photo: ओळखलत का या मुलाला ? अॅंग्री यंगमॅन ते नागरी पुरस्कारापर्यंतची मजल; बालदिनानिमित्त फोटो व्हायरल

आवडत्या कलाकाराचे बालपणीचे काही खास फोटो जर चाहत्यांना मिळाले तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. सध्या सोशल मीडियावर एका बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Celebs Childhood Photo: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय चालले आहे, हे पाहण्यासाठी प्रत्येक चाहता फारच उत्सुक असतो. केवळ त्याच्या चित्रपटांबद्दलच नाही तर चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खास माहिती जाणून घ्यायला आवडते. सेलिब्रिटींच्या बालपणापासून (Bollywood Celebs Childhood Photos) ते स्टार बनण्यापर्यंत, चाहत्यांना त्यांच्याबद्दल सर्वकाही जाणून घ्यायचे असते.

आवडत्या कलाकाराचे बालपणीचे काही खास फोटो जर चाहत्यांना मिळाले तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. सध्या अशाच एका सुपरस्टारचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून कोणालाही सांगणे कठीण होईल की हा स्टार नक्की कोण आहे. त्यामुळे हा फोटो पाहून तुम्हीही गोंधळून गेला असाल की, फोटोमध्ये दिसणारा हा गोंडस मुलगा कोण आहे. (Happy Children's Day)

ब्लॅक अँड व्हाईट फोटोत दिसणारा हा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. या वर्षात त्याच्याकडे सर्वाधिक चित्रपट होते. तो 90 च्या दशकापासून सिनेविश्वात सक्रिय आहे. कॉमेडीत तो जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो अभिनयातही तरबेज आहे. शिल्पा शेट्टी, रवीना टंडन,

माधुरी दीक्षितपासून त्याने करीना कपूर- खान, कतरिना कैफ, क्रिती सेनॉनसह सर्व बड्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. सोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत होता.

त्याची पत्नी जेष्ठ अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. फोटोत दिसणारा हा सुपर क्यूट दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा अँग्री यंगमॅन अक्षय कुमार (Akshay Kumar) आहे हे तुम्ही ओळखलेच असेल. अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेव स्टार आहे, त्याच्याकडे या वर्षात चार ते पाच चित्रपट आहेत. अक्षय हा इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. (Bollywood)

त्याच्या आधीच्या रिलीज झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे 'सम्राट पृथ्वीराज', 'बच्चन पांडे' आणि 'रक्षा बंधन' हे चित्रपट गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झाले आहेत. आता लवकरच अक्षय कुमार कठपुतली या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा पोलीसाची भूमिका साकारणार आहे, त्यामुळे त्याचे चाहते पोलीसांच्या वर्दीत त्याला पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. चित्रपटात अक्षय मारेकऱ्यांना पकडण्यासाठी कट रचताना दाखवलेला आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT