Celebrity Voting assembly election 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Celebrity Voting assembly election 2024: 'जय महाराष्ट्र' 'मी मतदान केलं. तुम्ही...?, सेलिब्रिटींचा मतदारांना खास संदेश, वाचा कोण काय म्हणालं?

Celebrity Vote For Maharashtra Assembly Election 2024: सामान्यापासून सर्वच सेलिब्रिटीमंडळी आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींनी फोटो पोस्ट केले आहेत.

Manasvi Choudhary

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे. राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होतं आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदाना सुरूवात झाली आहे. सायकांळी ७ वाजेपर्यंत मतदान आज सुरू असणार आहे. सामान्यापासून सर्वच सेलिब्रिटीमंडळी आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींनी फोटो पोस्ट केले आहेत.

मराठीसह बॉलिवूडविश्वातील सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचे फोटो व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर अनेकांनी कलाकारांनी मतदान केल्यानंतर चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मतदान केले आहे. प्राजक्ता माळीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कंटाळा न करता मतदान करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे.

सोनालीने संपूर्ण परिवारासह पिंपरी चिचवड येथे मतदान केले आहे. "योग्य selection, Today is the day of election, समाजात हवं असेल तर perfection, तर करू नका या संधीचं rejection" असं कॅप्शन दिलं आहे.

तेजस्विनी पंडीत सकाळीच मतदान केंद्राबाहेर दिसली. तेजस्विनीने मतदानाचा तिचा हक्क बजावला आहे. मी मतदान केलं. तुम्ही ?? लक्षात ठेवा, बोटं उगारायचा अधिकार हा बोटावर शाई लावल्यावरच मिळतो. आज मतदानाचा हक्क प्राधान्याने आणि जबाबदारीने बजावावा असं आवाहन केलं आहे

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलियासह मतदानाचा हक्क बजावला

आहे.अभिनेता हेमंत ढोमेने मतदान केलं आहे. सोशल मीडियावर हेमंतने मतदान केल्याचे फोटो शेअर केले आहेत.

'जय महाराष्ट्र' म्हणत अभिनेत्री सायली संजीवने मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेता अक्षय कुमारने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावरील व्यवस्था चांगली असल्याचं त्याने म्हटलंय. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने मतदान करावं, असं आवाहन केलं आहे.

अभिनेता राजकुमार राव यानेसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने मतदान केले आहे. सोनू सूद, फरहान अख्तर, मंदार चांदवाडकरने देखील मतदान केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT