Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Bollywood Celebrities : बिग बॉस मराठीच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. रितेश भाऊंचं सर्वत्र कौतुक होत आहे. पाहा सेलिब्रिटी काय म्हणाले.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi) चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉसचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोण होणार बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाचा विजेता हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे.

अंकिता, निक्की, सूरज, धनंजय दादा, अभिजीत आणि जान्हवी हे बिग बॉसचे टॉप सहा स्पर्धक आहेत. नुकत्याच झालेल्या एलिमिनेशनमध्ये वर्षा ताईंना बिग बॉस घराचा निरोप घ्यावा लागला. बिग बॉसचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, बॉलिवूडची अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) आल्या होत्या. तसेच गायक सलीम मर्चंट देखील बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावर आले. सेलिब्रिटींमुळे भाऊच्या धक्का खूप गाजणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर सेलिब्रिटींकडून रितेश भाऊंच (Riteish Deshmukh) खूप कौतुक होताना पाहायला मिळत आहे. त्याचे तसेच त्यांच्या होस्टिंगची स्टाईल प्रेक्षकांसोबत सेलिब्रिटींना ही खूप आवडली आहे. रितेश देशमुख सर्व सेलिब्रिटींना विचारतो की, बिग बॉसच्या मंचावर येऊन कसे वाटलं त्यावर अक्षय कुमार (Akshay Kumar) भाऊच कौतुक करताना बोलतो की, "मी शो पाहतो... मला खूप आवडतो... पण मला सर्वात जास्त हे आवडतं की तुम्ही जसा शो सांभाळता...तू जसा शो पाहतो आणि कंटेस्टेंट्सशी बोलतो ते मला खूप आवडते. " तर दुसरीकडे अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत बोलतात की, "तुम्हाला होस्टच्या भूमिकेत पाहून मला खूप आनंद होत आहे. आम्ही तुम्हाला या आधी असं होस्टिंग करताना नाही पाहिलं आहे. तर तुम्ही खूप छान होस्ट करत आहे आणि प्रेक्षक शोचा खूप आनंद घेत आहेत.

" गायक सलीम मर्चंट (Salim Merchant) बोलतो की, "खूप कमालचा शो आहे आणि तुमच्या येण्याने...यंदाचा जबरदस्त सीझन आहे. याच पूर्ण श्रेय तुम्हाला जात आहे." सर्वांकडून कौतुक ऐकून रितेश भाऊंना देखील खूप आनंद होतो. 'बिग बॉस मराठी 5' चा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्राला 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या नगरसेवकाचा घरात मृतदेह; आमदारांसह नेते-कार्यकर्ते दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

SCROLL FOR NEXT