Urfi Javed Instagram/ @urf7i
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Viral Video: उर्फी जावेदनं यावेळी हद्दच ओलांडली; अंतर्वस्त्राऐवजी लटकावले २ मोबाइल, पाहा VIDEO

सोशल मीडियावर नेहमीच उर्फी जावेद तिच्या नवनवीन कारनाम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. उर्फी सोशल मीडियावर दररोज काहीतरी नवीन आणि अनोखे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urfi Javed: सोशल मीडियावर नेहमीच उर्फी जावेद तिच्या नवनवीन कारनाम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. उर्फी सोशल मीडियावर दररोज काहीतरी नवीन आणि अनोखे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. उर्फी नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का देण्याचा तिचा प्रयत्न असतो.

दरम्यान उर्फी जावेदने तिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्सकडून उर्फीच्या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन स्वतःचा व्हिडिओ शेअर केला आहे.

यावेळी व्हिडीओमध्ये उर्फीने जो कारनामा केला आहे, तो बघून नेटकरी हैराण झाले. उर्फीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा लांब कोट आणि पँटमध्ये उर्फी दिसून येत आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे ब्रॅलेटऐवजी अभिनेत्रीने आपला लूक क्रिएटिव्ह बनवण्यासाठी दोन मोबाइल फोन लटकावले आहेत.

उर्फीने इनरवेअरऐवजी फोन वापरून बोल्डनेसला तडका दिलेला आहे. या व्हिडिओला काही वेळातच लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. उर्फीने पोस्ट शेअर करत 'फुल चार्ज्ड.' असा मजकूर लिहिला आहे. एकीकडे उर्फीचे चाहते तिच्या सर्जनशीलतेचे कौतुक करताना थकत नाहीत. तर दुसरीकडे काही यूजर्स तिची खिल्लीही उडवत आहेत.

मात्र उर्फी जावेदने युजर्सच्या कमेंट्सवर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. उर्फीने या व्हिडिओमध्ये तिचे केस बनमध्ये बनवले आहेत आणि न्यूड मेकअपसह तिचा लूक केला आहे. प्रत्येक वेळी उर्फी जावेद वेगळी स्टाईल करत असते. उर्फीचा हटके अवतार प्रत्येक वेळी लक्ष वेधून घेत आहे. अनेक स्टार्सनी उर्फीला तिच्या फॅशन सेन्सबद्दल थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; पार केला ४०० कोटींचा टप्पा

Maharashtra Politics: रामदास कदम अडचणीत; ठाकरे गटाचा नेता दाखल करणार अब्रूनुकसानीचा दावा

Airtel Cheapest Plan: 3 महिने रिचार्जची गरज नाही, एअरटेलने सादर केले बजेट-फ्रेंडली प्लॅन; वाचा किंमत आणि फिचर्स

Mhada Lottery : ठाण्यात कुणाला लागली लॉटरी? म्हाडाच्या ५३५४ घरांची सोडत जाहीर, अशी पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT