tripti dimri SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tripti Dimri Birthday : तृप्ती डिमरीचं खास बर्थडे सेलिब्रेशन; बॉयफ्रेंडसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS

Tripti Dimri Birthday Celebration : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचा नुकताच वाढदिवस झाला आहे. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो पाहा.

Shreya Maskar

सध्या चांगलीच चर्चेत असेली बॉलिवूडची अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri Birthday) हिचा 23 फेब्रुवारीला वाढदिवस होता. 'ॲनिमल' चित्रपटापासून तृप्ती डिमरीला भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. तृप्ती 31 वर्षांची झाली आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तरुणाईमध्ये तृप्तीचा मोठा चाहता वर्ग आहे. ती अनेक वेळा आपल्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत येते.

Sam Merchant

अभिनेत्री तृप्ती डिमरी एका बिझनेसमनला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशात आता तृप्तीने आपला वाढदिवस बॉयफ्रेंडसोबत साजरा केल्याचे पाहायला मिळत आहे. तृप्तीच्या बॉयफ्रेंडचे नाव सॅम मर्चेंट (Boyfriend Sam Merchant ) आहे. त्याने इन्स्टाग्रामवर तृप्तीसाठी खास स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉयफ्रेंड सॅम मर्चेंट एका स्टोरीमध्ये तृप्ती केक कापताना पाहायला मिळत आहे. तृप्तीने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. त्याने तिला खूप हटके स्टाइलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तृप्ती आजवर बॉयफ्रेंडसोबत अनेकदा स्पॉट झाली आहे.

Sam Merchant

तृप्ती डिमरी आता लवकरच 'धडक 2'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते तिचा आगामी चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तृप्तीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 6.1 मिलियन फॉलोअर्स आहे. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ तसेच कामासंबंधित माहिती तृप्ती येथे चाहत्यांसोबत शेअर करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT