Tripti Dimri And Karnesh Sharma Breakup Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tripti Dimri Breakup: तृप्ती डिमरीचा अनुष्का शर्माच्या भावासोबत ब्रेकअप?, थेट सोशल मीडियावरून हटवली पोस्ट...

Tripti Dimri And Boy Friend Relationship: तृप्ती आणि कर्णेश शर्माचे ब्रेकअप झाल्याची सध्या चर्चा आहे.

Chetan Bodke

Tripti Dimri And Karnesh Sharma Breakup Rumors: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी २०२१ पासून अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्माला डेट करत होती. एकमेकांनी नात्यातील अधिकृत रित्या घोषणा केली नसली तरी अनेकवेळा त्यांच्या फोटोंमधून चाहत्यांना हिंट्स मिळाल्या होत्या. परंतू नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती आणि कर्णेश शर्माचे ब्रेकअप झाल्याची सध्या चर्चा आहे.

सुरूवातीला दोघांच्याही ब्रेकअपच्या या चर्चा निव्वळ अफवा आहे, अशी चर्चा होत होती. पण नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती आणि कर्णेश या दोघांचंही ब्रेकअप झाल्याचं बोलले जात आहे.खासगी आयुष्यात गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड असलेली ही जोडी ‘बुलबुल’ आणि ‘कला’ या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली.

सोबतच मुख्य बाब म्हणजे, या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं असून सध्या या दोघांच्याही ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावरून तृप्तीने बॉयफ्रेंडसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. सध्या यामुळे सोशल मीडियावर खरंच दोघांचंही ब्रेकअप झालंय का याची चर्चा सुरू आहे. सोबतच, हे दोघेही प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटातील कॅरेक्टर पोस्टर्सही हटवले आहेत. या दोघांनीही ‘बुलबुल’आणि ‘कला’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली.

नेमकं ब्रेकअप करण्यामागील कारण गुलदस्त्यात असून दोघांमध्येही काहीतरी मतभेद झाले असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. सोबतच त्या दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. तृप्तीने ‘ॲनिमल’ चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पुन:रागमन केले असून ती लवकरच विकी कौशल सोबत ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोबतच यापूर्वी तृप्तीने ‘बुलबुल’आणि ‘कला’ या दोन्ही चित्रपटात उत्तम अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

भाजप कार्यालय फोडलं; 15-20 हल्लेखोरांकडून नेत्यांवर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Tejashri Pradhan Marriage: तेजश्री प्रधान आणि राकेश बापट लग्न करणार का? अभिनेत्याने विषय संपवला

Mumbai Coastal Road: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम वेगात; १० ठिकाणी इंटरचेंज; वाचा कुठून कसा असणार?

Maternal Sepsis: गर्भधारणेनंतरचा संसर्ग ठरू शकतो जीवघेणा, मॅटर्नल सेप्सिसबाबत महिलांनी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT