Sunny Leone Song SaamTv
मनोरंजन बातम्या

Sunny Leone: 'फना'मध्ये सनी लिओनीचे जबरदस्त ठुमके, गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

Sunny Leone Latest News: सनी लिओनीच्या 'फना' (Fanaa Song) या नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या गाण्याने सध्या युट्युबवर धुमाकूळ घातला आहे. सनीच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

Priya More

Sunny Leone fanaa Song:

बी- टाऊनची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leaone) नेहमीच या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी आपल्या फॅशन सेन्स, फोटो, चित्रपट तर कधी आपल्या नव्या प्रोजेक्टमुळे सनी लिओनी चर्चेत असते. सनी लिओनी देखील सोशल मीडियावर सक्रीय राहत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. सनी लिओनी आता पुन्हा चर्चेत आली आहे यामागचे कारण म्हणजे ती नव्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री सनी लिओनी अफलातून गाणं घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून बॉलिवूडच्या रसिकांना सनी लिओनीचा एक रोमांचक आणि जबरदस्त डान्स परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. सनी लिओनीच्या 'फना' (Fanaa Song) या नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या गाण्याने सध्या युट्युबवर धुमाकूळ घातला आहे. सनीच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

सनी लिओनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत 'फना' गाण्याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हे गाणं रिलीज झाल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे. तिने हे गाणं शेअर करत कॅप्शनमध्ये 'Embrace the heat, own the spotlight.' असे लिहिले आहे. या गाण्याला 24 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओमध्ये सशक्त नृत्यदिग्दर्शन आणि सनीची आकर्षक उपस्थिती दिसून येते असून कलात्मक बाजू यातून बघायला मिळत आहे. सनी लिओनी 'ग्लॅम फेम' या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतातील महत्वकांक्षी मॉडेलच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी हा नवा रियालिटी शो 'ग्लॅम फेम' (Glam Fame Show) लवकरच सुरू होणार आहे. या रियालिटी शोमध्ये नील नितीन मुकेश, ईशा गुप्तासोबत अभिनेत्री सनी लिओनी जजच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेत्री सनी लिओनी आता एका नवीन भूमिकेत पाऊल ठेवणार आहे. सनी लिओनी देशभरातील महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना प्रेरणा देणारा आगामी रिअॅलिटी शो 'ग्लॅम फेम' मध्ये जजची भूमिका बजावताना दिसणार आहे. हा एक अनोखा प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश भारतातील नव्या मॉडेल्सच्या स्वप्नांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत करणार आहे. या रियालिटी शोमध्ये नील नितीन मुकेश, ईशा गुप्तासोबत अभिनेत्री सनी लिओनी जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच ती केनेडी , कोटोशन गँग या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच ती Spiltsvilla सीझन 5 देखील होस्ट करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT