Sunny Leone SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sunny Leone : सनी लिओनीला सरकारी योजनेचे १००० रुपये मिळाले? नेमकं सत्य काय?

Sunny Leone Controversy : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या चर्चेत आहे. छत्तीसगडमधली सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचे नाव आढळून आले आहे. तसेच तिला योजनेचे पैसे मिळाल्याचे देखील बोले जात आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपट, गाण्यांमध्ये काम केले आहे. आपल्या कातिल अदांनी कायमच सनी लिओनी चाहत्यांना घायाळ केले आहे. आता पुन्हा एकदा सनी लिओनी चर्चेत आली आहे. सनी लिओनी एका सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे.

सनी लिओनीच्या खात्यावर सरकारी योजनेचे पैसे जमा झाले आहेत. छत्तीसगड सरकारच्या 'महतारी वंदन योजना' (Mahtari Vandana Yojana) लाभार्थी म्हणून तिला पैसे मिळाले आहे. अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, छत्तिसगड येथे सनी लिओनीच्या नावाने ऑनलाईन खाते उघडण्यात आले. 'महतारी वंदन योजना' विवाहित महिलांना 1000 रुपये दिले जात असे.

महतारी योजनेच्या वेबसाईटवर लाभार्थी यादीमध्ये सनी लिओनी आणि तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे. बस्तर जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर हा अर्ज करण्यात आला आहे. असे बोले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च आणि डिसेंबरचा हप्ता मिळाल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची सरकारकडून तपासणी केली जात आहे.

महतारी वंदन योजना

'महतारी वंदन योजना' अंतर्गत महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातात. या योजनेची वयोमर्यादा 21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. या योजनेची नोंदणी फेब्रुवारी 2024 पासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत या योजनेचा लाभ 70 लाखांहून अधिक महिलांना मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT