Sanam Kapoor reveal his baby face Instagram @sonamkapoor
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor: सोनम कपूरने दाखवली 'वायू'ची झलक, सोशल मीडियावर व्हिडिओ चर्चेत

सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने मुलगा वायुची पहिली झलक सर्वांसोबत शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sonam Kapoor Viral Video: अभिनेत्री सोनम कपूर सध्या पती आनंद आहुजासोबत व्हॅकेशन आनंद घेत आहे. आई झाल्यानंतर सोनम फिल्मी दुनियेपासून दूर राहून मुलगा वायुची काळजी घेण्यात व्यस्त आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने मुलगा वायुची पहिली झलक सर्वांसोबत शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये सोनम, आनंद आणि मुलगा वायुसोबत व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे.

सोनम कपूरने यावर्षी 20 ऑगस्टला मुलाला जन्म दिला. सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या मुलाचे नाव वायू ठेवले आहे. जेव्हा वायु एक महिन्याची झाला तेव्हा सोनमने त्याचा एक गोंडस फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती आनंदसोबत दिसली होती. फोटोमध्ये आनंदने मुलगा वायूला आपल्या मांडीवर घेतले होते. चाहत्यांना फोटोमध्ये वायुचा चेहरा पूर्णपणे दिसला नव्हता. सोनमने तीन महिन्यांनी तिच्या मुलाची पहिली झलक तिच्या चाहत्यांना दाखवली. सोनमने व्हिडिओच्या थंबनेलमध्ये मुलाचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वायू वडील आनंदच्या मांडीवर आहे आणि दोघेही वायूला प्रेमाने किस करताना दिसत आहेत. (Sonam Kapoor)

नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनम कारने प्रवास करताना दिसत आहे, तर आनंद कार चालवत आहे. त्यांचा मुलगाही गाडीत आहे. कारमध्ये वायुची झलक दिसत नाही. व्हिडिओमध्ये सोनम आणि आनंद दोघेही आपल्या मुलाला फिरायला घेऊन जाताना दिसत आहेत. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अथिया शेट्टी, भूमी पेडणेकर यांनी हार्ट इमोजी शेअर केले. याशिवाय आनंद आहुजाने लिहिले आहे की, "या जगात माझ्या जगासोबत." (Video)

2018 मध्ये सोनम आणि आनंद आहुजा यांनी एकमेकांशी लग्न केले. याआधी सोनम आणि आनंदने एकमेकांना खूप दिवस डेट करत होते. अलीकडेच सोनमने मुलगा वायुच्या नर्सरीचे फोटो शेअर केले आहेत. सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या मुलाची नर्सरी अतिशय सुंदर पद्धतीने सजवली आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT