Sonam Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor Delivery : मुलगा झाला हो...सोनम कपूरच्या घरी आला नवा पाहुणा; म्हणाली, आता आयुष्य बदललं...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनं गोड बातमी दिली आहे. आज, शनिवारी म्हणजेच २० ऑगस्टला तिनं बाळाला जन्म दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनं(Sonam Kapoor) गोड बातमी दिली आहे. आज, शनिवारी म्हणजेच २० ऑगस्टला तिनं बाळाला जन्म दिला. बऱ्याच दिवसांपासून सोनमच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगल्या होत्या. ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर सोनम कपूर किंवा तिचा पती आनंद अहुजाने शेअर केली नाही. तर एका दिग्गज अभिनेत्रीच्या माध्यमातून ही गुड न्यूज समोर आली आहे. तसेच या अभिनेत्रीनं सोनम आणि आनंदला शुभेच्छा दिल्या आहेत.

मधल्या काळात अनेक बातम्या समोर येत होत्या, ज्यात असे म्हटले जात होते की सोनम कपूरच्या घरी ऑगस्टमध्ये नवा पाहुणा येणार आहे. हे वृत्त खरे ठरले आहे. सोनम आणि आनंदच्या घरी आनंदाची बातमी आहे. सोनमला आज, २० ऑगस्ट २०२२ रोजी मुलगा झाला. या गोड बातमीमुळं सोनमच्या कुटुंबासह तिच्या चाहत्यांच्या आनंदालाही पारावार उरला नाही.

ही गोड न्यूज सर्वप्रथम रणबीर कपूरची आई म्हणजेच अभिनेत्री नीतू कपूर(Neetu Kapoor) यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे. नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सोनम आणि आनंद सोबतच आजी-आजोबा अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांचेही अभिनंदन केले आहे. नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक खास नोट शेअर केली आहे. ही खास नोट सोनम आणि आनंदने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

या खास नोटमध्ये सोनमने एका गोड बाळाला जन्म दिल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या कपलने देवाचे आभार मानले आहेत. तसेच सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आभार मानले आहेत. आमचे आयुष्य कायमचे बदलले असून, एक नवीन सुरुवात झाल्याचेही त्यात म्हटले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूर आणि बाळ दोघेही ठणठणीत आहेत. सोनम अलीकडेच तिचा भाऊ अर्जुन कपूरसोबत कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनमध्ये सहभगी झाली होती. अनेक कार्यक्रमांमध्येही तिने सहभाग घेतला होता. याशिवाय सोनमचा बेबी शॉवर सोहळाही लंडनमध्ये पार पडला. काही महिन्यांपूर्वी आनंद आणि सोनम कपूर बेबीमूनसाठी इटलीला गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT